सोमवारी १३६ कोरोनाबाधित : २२३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:08 AM2021-06-22T04:08:20+5:302021-06-22T04:08:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सोमवारी १३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत शहरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सोमवारी १३६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत शहरात २ हजार ४७० सक्रिय रुग्ण आहेत.
आज विविध तपासणी केंद्रांवर ३ हजार ८७२ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ३.५१ टक्के इतकी आहे. तर, आज १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ३५९ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ५०३ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख १८ हजार ७८४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७५ हजार ९९० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ६४ हजार ९८३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------