सोमवारी १५० बाधित, तर २४९ झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:38+5:302021-07-07T04:11:38+5:30

पुणे : शहरात सोमवारी दिवसभरात १५० कोरोनाबाधित आढळून आले असून, २४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू ...

On Monday, 150 were affected, while 249 were cured | सोमवारी १५० बाधित, तर २४९ झाले बरे

सोमवारी १५० बाधित, तर २४९ झाले बरे

googlenewsNext

पुणे : शहरात सोमवारी दिवसभरात १५० कोरोनाबाधित आढळून आले असून, २४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून, २ हजार ६७९ सक्रिय रुग्ण आहेत.

खासगी, तसेच शासकीय स्वॅब तपासणी केंद्रांवर ४ हजार ८४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ३.७ टक्के होती. दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १० रुग्णांचा समावेश आहे. शहरातील रविवारचा मृत्यूदर हा १.८ टक्के इतका आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: २९० रुग्ण गंभीर असून ४४८ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २६ लाख ९७ हजार ६९२ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७९ हजार ८८२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६८ हजार ५८६ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६१७ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

Web Title: On Monday, 150 were affected, while 249 were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.