सोमवारी १७७ कोरोनाबाधित, ५१४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:00+5:302021-06-09T04:12:00+5:30
पुणे : शहरात सोमवारी नवे १७७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ५१४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सद्य:स्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित ...
पुणे : शहरात सोमवारी नवे १७७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ५१४ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सद्य:स्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ९४३ इतकी आहे़
आज विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ७७५ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ३.७० टक्के इतकी आहे, तर आज २६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७८ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १ हजार २४९ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ६२५ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २५ लाख ४३ हजार ७७३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७२ हजार ४३१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ६० हजार ७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार ४१० जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------