सोमवारी १८७ कोरोनाबाधित : ३१९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:44+5:302021-06-16T04:12:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सोमवारी १८७ कोरोनाबाधित आढळून आले असून ३१९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सोमवारी १८७ कोरोनाबाधित आढळून आले असून ३१९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजारच्या आत आली असून सद्यस्थितीत २ हजार ८८८ सक्रिय रुग्ण आहेत.
आज विविध तपासणी केंद्रांवर ३ हजार ४४१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.४३ टक्के इतकी आहे, तर आज १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७८ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ५०२ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ७९९ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २५ लाख ८२ हजार २१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७४ हजार २९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६२ हजार ९२९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ४८२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती
आज बाधित रुग्ण - १८७
आज घरी सोडले - ३१९
एकूण बाधित रुग्ण - ४,७४,२९९
सक्रिय रुग्ण - २,८८८
आजचे मृत्यू - १३
एकूण मृत्यू - ८,४८२