सोमवारी १८९ कोरोनाबाधित : २७९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:12 AM2021-07-14T04:12:29+5:302021-07-14T04:12:29+5:30
पुणे : शहरात सोमवारी १८९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ४ ...
पुणे : शहरात सोमवारी १८९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ८०२ संशयीतांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़९३ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ९९१ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२५ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या ४९६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ४१ हजार ३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८२ हजार २३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७० हजार ३७६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------
पुण्यातील कोरोनास्थिती
सोमवारी बाधित - १८९
आज घरी सोडले - २७९
एकूण बाधित रुग्ण - ४,८२,०२३
सक्रिय रुग्ण - २,९९१
आजचे मृत्यू - ९
एकूण मृत्यू - ८,६५६