इंदापूरात भरदिवसा चकवा देऊन पैशांची पिशवी गायब; रस्त्यावर पडलेल्या दोन-चार नोटांसाठी २ लाख गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 04:24 PM2021-09-17T16:24:34+5:302021-09-17T16:54:13+5:30

इंदापुरातील चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Money bag disappears in Indapur all day long; Lost Rs 2 lakh for two-four notes lying on the road | इंदापूरात भरदिवसा चकवा देऊन पैशांची पिशवी गायब; रस्त्यावर पडलेल्या दोन-चार नोटांसाठी २ लाख गमावले

इंदापूरात भरदिवसा चकवा देऊन पैशांची पिशवी गायब; रस्त्यावर पडलेल्या दोन-चार नोटांसाठी २ लाख गमावले

Next
ठळक मुद्दे नोटा उचलण्याच्या नादात जवळील पैशाची पिशवी मोटार सायकलच्या हँडलला अडकवली

इंदापूर : लबाडीच्या उद्देशाने रस्त्यावर टाकलेल्या दोन-चार नोटा घेण्यासाठी दुचाकी वरून खाली उतरलेल्या दूचाकीस्वाराचे  २ लाख ३३ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास इंदापूर शहरात घडली. ही सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबत विकास मानसिंग भोसले ( वय ४२ ) रा. डाळज नं. १ यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

 भोसले इंदापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेमधून २ लाख ३३ हजार रुपये घेऊन घराच्या दिशेने जात होते. हिरो मोटार सायकल शोरूम जवळ रस्त्यावर अज्ञातांनी लबाडीच्या उद्देशाने दोन - चार नोटा टाकल्या. भोसलेंना आपल्याच नोटा पडल्या असं वाटल्याने त्यांनी नोटा उचलण्याच्या नादात जवळील पैशाची पिशवी मोटार सायकलच्या हँडलला अडकवली. त्याच क्षणी त्या अज्ञात चोरांनी पिशवी लंपास केली. सदरील चोरी प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर धनवे करीत आहेत.

Web Title: Money bag disappears in Indapur all day long; Lost Rs 2 lakh for two-four notes lying on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.