बीआरटी मार्गांवर राहणार समितीची देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 09:32 PM2018-03-27T21:32:17+5:302018-03-27T21:32:17+5:30

Monitoring of Committee on BRT Roads | बीआरटी मार्गांवर राहणार समितीची देखरेख

बीआरटी मार्गांवर राहणार समितीची देखरेख

googlenewsNext
ठळक मुद्देसमितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी पुणे व पिंपरी चिंचवडमधील बहुतेक सर्वच बीआरटी मार्गांची दुरावस्था

समितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी 
पुणे : शहरातील बीआरटी मार्गांवर आता स्वतंत्र समितीची नजर राहणार आहे. या मार्गांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बीआरटी मार्ग देखभाल व दुरूस्ती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पीएमपी व पालिका अधिकाºयांसह प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या समितीकडून महिन्यातून किमान एकदा बीआरटी मार्गांचा आढावा घेतला जाईल.
पुणे व पिंपरी चिंचवडमधील बहुतेक सर्वच बीआरटी मार्गांची दुरावस्था झाली आहे. मार्गावर होणारी अन्य वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शहरातील सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता आणि संगमवाडी रस्त्यावरील बीआरटी मार्गासाठी स्वतंत्र देखरेख समिती स्थापन केली आहे. सद्यस्थितीत बीआरटी मार्गांवरील विविध ठिकाणी वेळोवेळी देखभाल-दुरुस्तीच्या कामांवर नियंत्रण ठेऊन उपाययोजना करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही समिती महिन्यातून किमान एकदा बैठक घेऊन मार्गांवरील देखभाल-दुरूस्तीच्या कामांचा आढावा आढावा घेईल. मार्गाबाबत आलेल्या तक्रारींचे सात दिवसांत निराकरण करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी याबाबतच्या आदेशात स्पष्ट केले आहे. 
समितीच्या अध्यक्षपदी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांची म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक, महापालिकेच्या पथ विभागातील दोन अभियंते, विद्युत विभागातील दोन अभियंते, नागरिक चेतना मंचच्या कणिज सुखरानी, प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी व दि इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट पॉलिसी या संस्थेच्या प्रांजली देशपांडे आगाशे हे या समितीतील सदस्य असतील. समितीकडून बीआरटी मार्गाची पाहणी
‘पीएमपी’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी समितीतील सदस्यांसह मंगळवारी नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष बसने प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. 
----------
 मार्गावरील बसस्थानकांवर बस आल्यानंतर दरवाजे उघडणे अपेक्षित आहे. मात्र, काही बसेसचे दरवाजे उघडेच राहत असल्याचे निदर्शनास आले. डिजिटल माहितीदर्शक फलक बंद आहेत. वाहनचालकांकडूनही घुसखोरी केली जात आहे.मार्गाची पाहणी करत असताना आढळून आलेल्या त्रुटींबाबत पालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे. बीआरटी मार्गासाठी पालिकेन १० कोटींचा निधी दिला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत मार्गांवरील त्रुटी दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
                                                                                                                                                     अजय चारटणकर,समिती अध्यक्ष 

Web Title: Monitoring of Committee on BRT Roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.