माकड पळविणारा फरारच; नाव निष्पन्न

By admin | Published: June 29, 2015 11:56 PM2015-06-29T23:56:53+5:302015-06-29T23:56:53+5:30

महाड-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाटातील माकड गाडीत घालून पळवून नेणारा दीपक ऊर्फ दादा घिसरे (रा भिवरी, ता. पुरंदर) या आरोपीचा शोध लावण्यात भोर पोलीस व वन विभागाला यश

Monkey fleeing; Nomination | माकड पळविणारा फरारच; नाव निष्पन्न

माकड पळविणारा फरारच; नाव निष्पन्न

Next

भोर : महाड-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाटातील माकड गाडीत घालून पळवून नेणारा दीपक ऊर्फ दादा घिसरे (रा भिवरी, ता. पुरंदर) या आरोपीचा शोध लावण्यात भोर पोलीस व वन विभागाला यश आले असून या चोरीतील गाडी जप्त करून भोर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. मात्र, माकड पळवणारा दीपक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे़
याबाबत वन विभाग व भोर पोलिसांकडून मिळालेली महिती अशी कि २२ जूनला दीपक घिसार हा एम.एच.१२ जी. एफ या आय २० गाडीतून कोकणात फिरायला गेला असल्याचे समजते़ घाट चढुन वर आल्यावर त्या दरम्यान वरंध घाटातील वाघजाई मंदिरासमारेच्या संरक्षक भितीवर माकडे उभी असतात़ पर्यटक त्यांना खायला घालतात़ त्यामुळे ही माकडे त्यांच्यामागे लागतात़ दीपकने उभी असलेल्या माकडाच्या पिल्लाला खायला देण्याच्या बाहाण्याने उचलुन आपल्या गाडीच्या डिक्कीत टाकुन पळवून नेले़ यावेळी इतर माकडे गाडीच्या मागे धावत होती, याचे एका प्राणीमित्राने चित्रीकरण करुन ते सर्वत्र पाठवण्यात आल्यावर मोठया प्रमाणात चर्चा झाली आणी २३ जुनला वनविभागकडून भोर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीकांत खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, विठठल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. आर. झगडे, पोलीस जमादार नाना जेधे, रमेश साळुंके, वनपाल शेक यांनी सलग चार दिवस कात्रज पुणे येथील वंडरशिटी, सासवड येथे तपास करुन दीपक घिसार याचा शोध लावला असता या चोरीतील गाडी भिवरी ता.पुरंधर येथील एका धाब्यावर सापडली़ गाडीचा नंबर खोडण्याचा प्रयत्न केला असुन गाडीच्या मागे आपली माणस असे लिहिलेले आहे.

Web Title: Monkey fleeing; Nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.