राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; जाणून घ्या पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 09:02 AM2022-07-25T09:02:31+5:302022-07-25T09:05:44+5:30
घाट परिसरात मुसळधारची शक्यता....
पुणे : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे पुणे शहर व परिसरात पुढील चार दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. तसेच जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीही जवळपास इतकाच पाणीसाठा होता. पुणे शहरात रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. अधून मधून एखादी हलकी सर येत होती. १ जूनपासून पुण्यात ३५३ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या तुलनेत ६५.३ मिमी अधिक आहे.
घाट परिसरात मुसळधारची शक्यता
पुढील दोन दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.