मॉन्सून केरळात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:19+5:302021-06-04T04:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नैर्ऋृत्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे (मॉन्सून) केरळात आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागा (आयएमडी) ने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नैर्ऋृत्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे (मॉन्सून) केरळात आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागा (आयएमडी) ने गुरुवारी (दि. ३) सकाळी जाहीर केले. यंदा मॉन्सून ३१ मे रोजी केरळात येण्याचा अंदाज देण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपासून केरळमध्ये पाऊसही सुुरू झाला. मात्र, मॉन्सून आगमनाचे आवश्यक निकष आणि पावसातले सातत्य लक्षात घेऊन त्याची आगमनाची वर्दी गुरुवारी देण्यात आली.
मॉन्सूनने गुरुवारी दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडू, कोमोरिनचा उर्वरित भाग, बंगाल उपसागराच्या काही भागात प्रवेश केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. येत्या २ दिवसांत दक्षिणेकडील अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, केरळ व लक्षद्वीपचा उर्वरित भाग, तमिळनाडू व पुद्दुचेरीचा काही भाग आणि दक्षिण कर्नाटकच्या रायलसीमापर्यंत मॉन्सूनचे आगमन होण्यासाठी अनुकूल हवामान आहे.
चौकट
मॉन्सूनच्या केरळातील आगमनाची सरासरी तारीख १ जून आहे. यंदा ही तारीख दोन दिवसांनी पुढे गेली. गेल्या सहा वर्षांतील केरळातील मॉन्सून आगमनाचा हवामान विभागाने दिलेला अंदाज आणि प्रत्यक्ष आगमनाच्या तारखा पुढीलप्रमाणे - (कंसात अंदाज)
वर्ष मॉन्सून आगमन
२०१६ ८ जून (७ जून)
२०१७ ३० मे (३०मे)
२०१८ २९ मे (२९ मे)
२०१९ ८ जून (६ जून)
२०२० ५ जून (१ जून)
२०२१ ३ जून (३१ मे)