Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार

By श्रीकिशन काळे | Published: June 9, 2024 02:36 PM2024-06-09T14:36:29+5:302024-06-09T14:37:05+5:30

मॉन्सूनमुळे पुणे जिल्ह्यासह रत्नागिरी, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली

Monsoon hits Pune Dharashiv Latur It will cover the rest of Maharashtra in a couple of days | Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार

Monsoon Update: मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूरपर्यंत; एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार

पुणे : नैऋत्य मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

दोन दिवसांपूर्वी मॉन्सून दक्षिण कोकण आणि बारामतीपर्यंत पोचला होता. त्यानंतर शनिवारी (दि.८) माॅन्सूनने विश्रांती घेत आपला मुक्काम तिथेच ठोकला. त्यानंतर रविवारी पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड भागात मजल मारली. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून जाईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 
महाराष्ट्रात माॅन्सून गुरुवारी (दि. ६) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये आला होता. त्यानंतर आता तो मराठवाड्यातील आणि प. महाराष्ट्रातील काही भागात पोचला आहे. खरंतर चार दिवस अगोदरच मॉन्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला. त्यानंतर शनिवारी (दि.८) राज्याच्या आणखी काही भागांत वाटचाल केली.  शनिवारी (दि. ८) मॉन्सूनमुळे रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. तर पुणे जिल्ह्यासह लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत मॉन्सून पोचला. तिथेही काही भागात पाऊस झाला. दरम्यान, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत मोसमी वारे पोहोचलेले आहेत. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मॉन्सून लवकरच प्रवेश करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  

राज्यातील पाऊस 

नांदेड - २०.८ मिमी 
सांगली - १९.३ मिमी 
ठाणे - १९.४ मिमी 
उदगीर - ४७ मिमी 
सातारा - ६१ मिमी 
सोलापूर - ११.६ मिमी 
कोल्हापूर - १६.९ मिमी 
पुणे - ११७.१ मिमी
धाराशिव - ५७.४ मिमी
बारामती - ५१.२ मिमी
नगर - १९.८ मिमी
नागपूर - १९.८ मिमी
रत्नागिरी - १०७.४ मिमी

Web Title: Monsoon hits Pune Dharashiv Latur It will cover the rest of Maharashtra in a couple of days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.