राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय; मात्र मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाला जोर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 07:57 PM2021-07-11T19:57:06+5:302021-07-11T19:57:13+5:30

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट

Monsoon once again active in the state; However, Central Maharashtra still does not receive heavy rainfall | राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय; मात्र मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाला जोर नाही

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय; मात्र मध्य महाराष्ट्रात अजूनही पावसाला जोर नाही

Next
ठळक मुद्देविदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे: मॉन्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असला तरी त्याचा जोर अजूनही कोकण आणि विदर्भामध्ये दिसून येत आहे येत्या २४ तासात रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकणातील सर्व जिल्हे तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकणातील गुहागर १००, काणकोण, हर्णे, श्रीवर्धन ७०, पेडणे, रत्नागिरी ६०, देवगड, म्हापसा, मार्मगोवा, वाल्पोई ५०, दोडामार्ग, पणजी, केपे, राजापूर, सांगे, वैभववाडी, वसई ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याचबरोबर कोकणातील बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ७०, धुळे ५०, इंदापूर ४०, शिरपर ३०, सांगोला ३०, चोपडत्त, महाबळेश्वर, माळशिरस, पन्हाळा १० मिमी पाऊस पडला. मराठवाड्यातील माहूर ५०, भोकरदन, परभणी, उमरगा ४०, औंढा नागनाथ, भूम पारंडा ३० मिमी पाऊस झाला. तसेच काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. विदर्भात बटकुली, दारव्हा ९०, आर्णी, दिग्रस ७०, अंजनगाव, बाभुळगाव, दर्यापूर, मालेगाव, मूर्तिजापूर, सेलू, वर्धा ५०, अमरावती, देवळी, जिवती, कळंब, कोरपना, नागपूर, पातूर, वणी, समुद्रपूर, झरीझमनी ४० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला आहे.

सोमवारपासून अनेक जिल्ह्यात तुरळक आणि मुसळधार पावसाची शक्यता  

रविवारी दिवसभरात परभणी येथे ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई १८, पणजी २०, रत्नगिरी १०, महाबळेश्वर ६ मिमी पाऊस झाला आहे. १२ जुलै रोजी कोकणातील बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Monsoon once again active in the state; However, Central Maharashtra still does not receive heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.