मॉन्सून सर्वसाधारण राहणार
By admin | Published: April 27, 2017 05:07 AM2017-04-27T05:07:20+5:302017-04-27T05:07:20+5:30
दक्षिण नैर्ऋत्य मोसमी पावसाचा पाऊस यंदा सर्वसाधारण राहणार असून तळकोकण, राजस्थान, मध्य प्रदेश, तमिळनाडूचा काही भाग
पुणे : दक्षिण नैर्ऋत्य मोसमी पावसाचा पाऊस यंदा सर्वसाधारण राहणार असून तळकोकण, राजस्थान, मध्य प्रदेश, तमिळनाडूचा काही भाग या परिसरात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊसमान राहण्याची शक्यता आहे़ भूतान येथे २४ ते २६ एप्रिल दरम्यान साऊथ एशियन क्लायमेट फोरमची बैठक झाली़ या बैठकीनंतर दक्षिण आशियाई देशातील हवामान शास्त्रज्ञांनी एकमताने मान्सूनबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे़
भारतीय हवामान विभागाच्या पुढाकाराने दक्षिण आशियाई खंडात पडणाऱ्या मान्सूनचा अंदाज घेण्यासाठी २००५ पासून दर वर्षी बैठक घेतली जाते़ यंदा ही बैठक भूतान येथे झाली़ आतापर्यंतच्या निरीक्षणानुसार एल निनोचा प्रभाव अतिशय अल्प असून तो मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात विकसित होण्याची शक्यता आहे़ तो विकसित होण्याचा आणि वेळेबाबत अजूनही अनिश्चितता आहे़ असे असले तरी मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात एल निनोचा प्रभाव पडणार नाही, यावर सर्वांचे एकमत झाले आहे़
ओडिशा, म्यानमारचा काही भाग, तमिळनाडूचा पश्चिमेकडील भाग या पूर्व आणि दक्षिण पश्चिम आशियात सरासरी पाऊसमान राहील.