पैशांच्या हव्यासापोटी पतीचे राक्षसी कृत्य; अवघ्या ३ हजारांत पत्नीला केली मित्राच्या हवाली

By नम्रता फडणीस | Published: August 22, 2023 05:01 PM2023-08-22T17:01:36+5:302023-08-22T17:02:08+5:30

पत्नीची इच्छा नसतानाही मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले

Monstrous act of husband for want of money In just 3 thousand the wife was handed over to a friend | पैशांच्या हव्यासापोटी पतीचे राक्षसी कृत्य; अवघ्या ३ हजारांत पत्नीला केली मित्राच्या हवाली

पैशांच्या हव्यासापोटी पतीचे राक्षसी कृत्य; अवघ्या ३ हजारांत पत्नीला केली मित्राच्या हवाली

googlenewsNext

पुणे: पैशाच्या हव्यासापोटी पतीने आपल्या पत्नीला वाममार्गाला लावत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते. इतकेच नाही तर अवघ्या तीन हजार रुपयात पतीने आपल्या पत्नीला चक्क मित्रांच्या हवाली केले होते. याप्रकरणी पतीच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी एका 25 वर्षांच्या विवाहित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीला अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे. पोलिसांनी अटक केलेल्या मित्रांची नावे आदित्य गौतम (रा.कसबा पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव) अशी आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिलेच्या पतीने आपली पैशाची गरज भागवण्यासाठी फिर्यादी यांना मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर आपल्या दोन मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर पतीच्या मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले. पत्नीची इच्छा नसतानाही मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. डिसेंबर 2020 पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही मित्रांना अटक केली आहे.

Web Title: Monstrous act of husband for want of money In just 3 thousand the wife was handed over to a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.