ऑगस्ट महिन्यात ७१ मालगाड्या धावल्या, पुणे विभागाचे २९ कोटीचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:01+5:302021-09-04T04:16:01+5:30
पुणे : पुणे रेल्वे विभागात ऑगस्ट महिन्यात ७१ मालगाड्यांमध्ये माल भरून देशातील विविध ठिकाणी धावल्या. यात वाहने, ...
पुणे : पुणे रेल्वे विभागात ऑगस्ट महिन्यात ७१ मालगाड्यांमध्ये माल भरून देशातील विविध ठिकाणी धावल्या. यात वाहने, साखर, पेट्रोल, डिझेल आदी प्रकारच्या वस्तूची वाहतूक झाली. यातून पुणे विभागाला २९ कोटी ४९ लाख रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले. गेल्या पाच वर्षात एका महिन्यात मिळणाऱ्या उत्पन्नात हा आकडा सर्वाधिक आहे.
एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पुणे विभागाने मालवाहतूकीतून ९५ कोटी २३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. गेल्या पाच वर्षातला हा देखील आकडा सर्वधिक आहे. विभागात साखर व वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही दिवसापासून वाणिज्य विभागाची कर्मचारी मालवाहतूक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. या कर्मचाऱ्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा व वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.