उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:45+5:302021-05-29T04:09:45+5:30

पिकांचे नुकसान : महावितरणाचे दुर्लक्ष; तातडीने दुरुस्तीची मागणी उंडवडी कडेपठार : येथील गावठाण ए.जी.रोहित्र शेतीपंपाची थ्री ...

For a month at Undwadi Kadepathar | उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून

उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून

Next

पिकांचे नुकसान : महावितरणाचे दुर्लक्ष; तातडीने दुरुस्तीची मागणी

उंडवडी कडेपठार : येथील गावठाण ए.जी.रोहित्र शेतीपंपाची थ्री फेज वीजपुरवठा एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे पाण्याअभावी येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जळालेल्या रोहित्राची तातडीने दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

एक महिन्यापासून येथील विद्युत रोहित्र जळाले आहे. येथील शेतकऱ्यांनी अनेकदा संबंधितांशी संपर्क करुन माहिती दिली. आज दुरुस्ती होईल. उद्या दुरुस्ती होईल, अशी उत्तरे संबंधितांकडून शेतकऱ्यांना मिळत आहेत. एक महिना होऊनही जळालेले रोहित्राची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या जळालेल्या रोहित्रावर जवळपास २२ शेतकऱ्यांचा वीजजोड आहे. सध्या शेतीमध्ये मका, कडबा, भुईमूगाचा पीक आहे. तसेच इतर पिके शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी असून देखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत तर काही पिके पूर्णपणे जळून गेली आहे.

त्याच बरोबर गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्या ठिकाणच्या बोरवेल, विहिरींचे पाणी शेतकऱ्यांनी घरी पिण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी तसेच घरी वापरासाठी पाईपलाईनच्या माध्यमातून आणले आहे. एक महिना होऊनदेखील महावितरणाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई महावितरणाने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

—————————————————

उंडवडी कडेपठार येथील गावठाण ए.जी.विद्युत रोहित्र एक महिन्यापासून बंद असल्यामुळे मका पिक पूर्णपणे जळाल्याचे चित्र.

२८०५२०२१-बारामती-१०

Web Title: For a month at Undwadi Kadepathar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.