यवत येथील गरीब कुटुंबाला एक महिन्याचे अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:08+5:302021-06-10T04:09:08+5:30

यवत येथील अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट व सेव्ह द चिल्ड्रन संस्था, पुणे यांच्या मदतीने युवा कार्यकर्ते गणेश शेळके यांनी ...

A month's worth of food for a poor family in Yavat | यवत येथील गरीब कुटुंबाला एक महिन्याचे अन्नधान्य

यवत येथील गरीब कुटुंबाला एक महिन्याचे अन्नधान्य

Next

यवत येथील अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट व सेव्ह द चिल्ड्रन संस्था, पुणे यांच्या मदतीने युवा कार्यकर्ते गणेश शेळके यांनी इंदिरानगर झोपडपट्टीमधील १०० गोरगरीब कुटुंबाना १ महिन्याचे अन्नधान्य व किराणा वाटप केले.

वाटप करण्यात आलेल्या किट मध्ये मध्ये दहा किलो तांदूळ, दहा किलो पीठ, तूरडाळ, मूगडाळ, सोयाबीन, मीठ , साखर , चहा पावडर ,२ किलो गोडतेल अशा विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला होता.

अन्नधान्य वाटपचा कार्यक्रम कोणताही गाजावाजा न करता करण्यात आला. यावेळी अनुराग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय काटम , सचिव सुनीता काटम , सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे व्यवस्थापक हरीश वैद्य , इपशिता दास , सरपंच समीर दोरगे , सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके , साक्षी काटम , अनुराग काटम उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : ०९यवत अन्नधान्य वाटप

फोटो ओळ : - यवत येथील अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट व सेव्ह द चिल्ड्रन संस्था, पुणे यांच्या मदतीने अन्नधान्य व किराणा किट वाटप करताना सरपंच समीर दोरगे , गणेश शेळके , विजय काटम , सुनीता काटम आदी

Web Title: A month's worth of food for a poor family in Yavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.