‘मोक्का’ लागलेले ‘ते १५ जण’ मुळशीतील

By admin | Published: November 12, 2015 02:31 AM2015-11-12T02:31:43+5:302015-11-12T02:31:43+5:30

पुरंदर येथे नुकतीच १५ जणांच्या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली असून, ते सर्व मुळशी तालुक्यातील आहेत

The 'Mooka' will have '15 people' rooted | ‘मोक्का’ लागलेले ‘ते १५ जण’ मुळशीतील

‘मोक्का’ लागलेले ‘ते १५ जण’ मुळशीतील

Next

पौैड : पुरंदर येथे नुकतीच १५ जणांच्या टोळीविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली असून, ते सर्व मुळशी तालुक्यातील आहेत. या कारवाईमुळे येथील गुन्हेगारीला चाप बसण्यास मदत झाल्याचे पौडचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली. आणखी काही जणांवर ही कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील खळद येथील अपहरण व खंडणी तसेच विविध गुन्ह्यांत सहभागी असल्याच्या कारणावरून ही कारवाई केली आहे. यातील १३ आरोपी येरवडा कारागृहात असून, दोन जण फरारी आहेत. किरण दामू रेणुसे ऊर्फ गणपत उत्तेकर (टोळीप्रमुख, रा. मुठा), हर्षल विष्णू मोरे, समीर हरिभाऊ हरपुडे, शेखर उकरंडे, शरद रामभाऊ मोहोळ, विजय बबन तोंडे, अमोल बापू येवले, अमित भाऊसाहेब पोकळे, दत्ता अरुण कदम, प्रवीण पोपट शेलार, राहुल रमेश तोंडे, सागर दगडू कांबळे, रामदास गोविंद वांजळे, अमित सुरेश कदम, अक्षय चंद्रकांत पाटील अशी आरोपींची नावे असून, त्यांपैकी शेखर अप्पा उकरंडे व आकाश चंद्रकांत पाटील हे फरारी आहेत.
पौडचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी सांगितले, की केलेल्या अधिक तपासात या सर्व आरोपींची पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी संघटित गुन्हेगारी सुरू असल्याचे पुरावे मिळाले होते. ते सर्व मूळचे मुळशी तालुक्यातील असून, मुळशी व पुणे शहरातील विविध ठिकाणचे रहिवासी आहेत. गुन्हेगारीला चाप बसण्यासाठी पौड पोलिसांनी घोटावडे फाटा येथे पोलीस चौकी तयार करून नाकेबंदी सुरू केली आहे. सध्या पिरंगुट एमआयडीसी, मुकाईवाडी, पिरंगुट घाटांत बीट मार्शलद्वारे २४ तास गस्त वाढवली आहे.
खंडणीच्या गुन्ह्यात नुकत्याच एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पौड पोलिसांना यश आले आहे.

Web Title: The 'Mooka' will have '15 people' rooted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.