चंद्र दर्शन झाले, आज रमजान ईद

By admin | Published: June 26, 2017 04:07 AM2017-06-26T04:07:28+5:302017-06-26T04:07:28+5:30

शहरात रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. रमजान ईदनिमित्त गोळीबार

Moon appeared, today is Ramzan Id | चंद्र दर्शन झाले, आज रमजान ईद

चंद्र दर्शन झाले, आज रमजान ईद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदानाजवळील ईदगाह मैदान सामूहिक नमाजपठणासाठी सज्ज करण्यात आले आहे. सोमवारी ईद होणार हे निश्चित झाल्यानंतर रमजान ईद निमित्त शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू झाली होती. त्याचबरोबर नातेवाईक, मित्र-परिवाराला ईद निमित्त सहकुटुंब घरी येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
इस्लामिक कालदर्शिकेच्या नियमाप्रमाणे नववा रमजान महिना संपत असून, सोमवारी दहावा महिना शव्वालचा प्रारंभ होणार आहे.
या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मुस्लिमबांधव ईद-उल-फित्र अर्थात, रमजान ईद साजरी
करतात. ईद-उल-फित्र निमित्त
शहरात ठिकठिकाणी सामूहिक नमाजपठण करण्यात येते.
त्यासाठी शहरात काही ठिकाणी सकाळी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
नमाजपठणामुळे वाहतुकीत बदल
ईगाह मैदानात होणाऱ्या नमाजासाठी सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून नमाज पठण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान आणि तिथपासून ढोलेपाटील चौकापर्यंतची सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर खडकी बाजार, चिंचवड, भोसरी, हांडेवाडी रोड, हडपसर, घोरपडी बाजार, डायमंड कंपनी, मुंढवा परिसरात नमाज पठण होत असताना वाहतूक बंद राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Web Title: Moon appeared, today is Ramzan Id

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.