आगामी निवडणुकीत भाजपचे शंभराहून अधिक नगरसेवक पालिकेत दिसतील : खासदार बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:08+5:302020-12-30T04:14:08+5:30

पुणे : राज्यात भाजपची सत्ता असताना पुण्यात मोठ्याप्रमाणावर निधी दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत. भाजपने ...

More than 100 BJP corporators will appear in the upcoming elections: MP Bapat | आगामी निवडणुकीत भाजपचे शंभराहून अधिक नगरसेवक पालिकेत दिसतील : खासदार बापट

आगामी निवडणुकीत भाजपचे शंभराहून अधिक नगरसेवक पालिकेत दिसतील : खासदार बापट

Next

पुणे : राज्यात भाजपची सत्ता असताना पुण्यात मोठ्याप्रमाणावर निधी दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत. भाजपने पुणेकरांना दिलेला शब्द पाळला असल्याने, आगामी निवडणुकीमध्ये भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक महापालिकेत असतील. असे सांगून खासदार गिरीष बापट यांनी २०२२ मध्ये होणार्‍या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

शहर भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भाजप नगरसेवकांसोबतच्या बैठकांमध्ये नगरसेवकांनी केलेली विकास आणि सामाजिक कामे, उभारलेले प्रकल्प, अर्धवट प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी आवश्यक निधी आदींबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बापट यांच्यासह शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी माहिती दिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे याप्रसंगी उपस्थित होते.

गावे समावेश करण्यास विरोध नाही. परंतु तेथील गावात सुविधा करण्यास राज्य शासनाने निधी दिला पाहिजे. आता पर्यंत जिल्हा परिषदेत ही गावे होती. तेथे कामे करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस कामे करण्यास कमी पडले. हे अपयश झाकण्यासाठी गावे पालिकेत घेण्याचा घाट घातला आहे. - जगदीश मुळीक, शहर अध्यक्ष, भाजप

---------

Web Title: More than 100 BJP corporators will appear in the upcoming elections: MP Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.