शहरात दीड हजारपेक्षा अधिक अनधिकृत मोबाईल टॉवर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 12:00 PM2018-12-21T12:00:17+5:302018-12-21T12:05:29+5:30

शहरात सध्या उभे असलेले १ हजार ८९५ पैकी कवेळ २३८ मोबाईल टॉवर अधिकृत आहे...

More than 1500 unauthorized mobile towers in the city | शहरात दीड हजारपेक्षा अधिक अनधिकृत मोबाईल टॉवर्स

शहरात दीड हजारपेक्षा अधिक अनधिकृत मोबाईल टॉवर्स

Next
ठळक मुद्देमोबाईल टॉवर्समुळे होता त्रास : महापालिकेकडे नागरिकांच्या तक्रारीमहापालिकेला मोबाईल टॉवरच्या माध्यमातून ७ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न

पुणे : गेल्या काही वर्षांत शहरात सर्वच भागात इमारतीच्या छतावर सर्रास अनधिकृतपणे मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. शहरात सध्या उभे असलेले १ हजार ८९५ पैकी कवेळ २३८ मोबाईल टॉवर अधिकृत आहे. तब्बल १ हजार ६५७ मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचे प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संगनमतांनी अशा बेकायदेशीर टॉवरची उभारणी होत आहे. मोबाईल टॉवर्सच्या रेडियशनमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे केल्या आहेत. 
शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर्स, यासाठी महापालिकेकडून आकारण्यात येणारा दर, यामुळे महापालिकेला मिळणार उत्पन्न, नागरिकांच्या आलेल्या तक्रारी आणि करण्यात आलेली कारवाईबाबत नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी प्रशासनाला लेखी प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना वरील माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या हद्दीत विविध मोबाईल कंपन्यांकडून सर्व भागात इमारतींच्या छतावर, जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारले आहेत. 
शहरात मोबाईल टॉवरला परवानगी देण्यासाठी स्कु्रटिनी फी म्हणून प्रत्येकी ६०० रुपये आणि एकरकमी प्रशासकीय शुल्क रक्कम ३० हजार रुपये, इमारतीवरली मोबाईल टॉवर बांधकामासाठी शिघ्रसिध्दागणक दराच्या ४० टक्क्या पैकी ८ टक्क्या नुसार दर घेतले जातात. तर मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर असल्यास ८ टक्क्या पैकी जागेच्या शिघ्रसिध्दगणक दरानुसार मोबाईल टॉवरला परवानगी देण्यासाठी दर आकारले जातात. 
मोबाईल टॉवरच्या माध्यमातून महापालिकेला ७ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मोबाईल टॉवरच्या मिळकत करातून एप्रिल ते ३ डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत ३१ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शहरात सर्रास उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरच्या रेडिअशनमुळे इमारती लगतच्या नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत महापालिकेकडे नागरिकांनी लेखी तक्रारी देखील केल्या आहेत. ज्या भागातून नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या त्या मोबाईल टॉवरवर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.  

Web Title: More than 1500 unauthorized mobile towers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.