पश्चिम हवेलीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:16 AM2021-01-16T04:16:07+5:302021-01-16T04:16:07+5:30
गावकी आणि भावकीचा थेट संबध असल्यामुळे गावागावातुन पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राखीव पोलीस पथक तैनात ठेवण्यात आले ...
गावकी आणि भावकीचा थेट संबध असल्यामुळे गावागावातुन पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राखीव पोलीस पथक तैनात ठेवण्यात आले होते. कोणत्याही गावात अनुचित प्रकार घडला नसल्याचे हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी स्पष्ट केले.
पश्चिम हवेलीतील गोऱ्हे बुदृक, डोणजे, वरदाडे, सोनापूर, आंबी, कुडजे, मांडवी, खडकवाडी, बहुली. घेरासिंहगड. या गावांमध्ये गावकारभाऱ्याची निवड करण्यासाठी ग्रामस्थामध्ये उत्साह होता. अनेक मतदार नागरीक कामावरून खास मतदान करण्यासाठी आपापल्या गावात येउन मतदान करत होते. उमेदवार मतदारांना मतदानाचे अवाहन करत मतदार यादीमध्ये नाव शोधून देत होते. अनेक उमेदवार गावातील विकासाचा दृष्टीकोन मतदाराला खासगीत स्पष्ट करत होते. मतदान केंद्रावर कोणत्याही प्राथमिक अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतल्याचे सोनापूर गावच्या पोलीस पाटील गौरी मारूती चव्हाण यांनी सांगितले.
वरदाडे येथे १०४८ मतदांरापैकी ८३३ (८०टक्के) जणानी सहा सदस्यांसाठी मतदान केले. तेथील एका सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. सोनापूर येथे एकूण 792 मतदारांपैकी ७३९(९3 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गोऱ्हे बुदृक येथे८० टक्के मतदान झाले ६२४ पैकी ५०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. घेरा सिंहगड ग्रामपंचायतीसाठी ८८टक्के मतदान झाले. डोणजे येथील एका जागेसाठी ७९ टक्के मतदान झाले. तेथील दाहा सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
चौकट
प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक जागा बिनविरोध निवडून आल्यामुळे हवेली तालुक्यात २०९ मतदान केंद्रावर आज मतदान झाले. कोठेही
अनुचित प्रकार घडला नाही. नुवडणूक यंत्रणेनेत अचानक अडचण आल्यास प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह पथके तयार करण्यात आली आहे.
सुनिल कोळी
तहसीलदार हवेली तालुका.
फोटो ओळी
ग्रामस्थ मतदार आपल्या गावकारभाऱ्याच्या निवडीसाठी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावत होते.
हवेली तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या वरदाडे गावात मतदान करताना ग्रामस्थ.