राज्यातील ६.३४ टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:51+5:302021-07-17T04:09:51+5:30
यंदा ८० ते ८५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी ही संख्या १ लाख ५७ हजार ...
यंदा ८० ते ८५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी ही संख्या १ लाख ५७ हजार ९१३ (९.४६ टक्के) होती. ती यंदा वाढून १ लाख ८५ हजार ५४२ (११.२५ टक्के) इतकी झाली. तसेच ७५ ते ८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षीची १ लाख ७८ हजार ७१२ विद्यार्थी संख्या वाढून यंदा ती २ लाख ३२ हजार ४४२ इतकी (१४.०९ टक्के) झाली आहे. तर ७० ते ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मागील वर्षी ती १ लाख ८६ हजार ८३७ इतकी (११.४१ टक्के) होती. ती यंदा २ लाख ५२ हजार ४४४ इतकी (१५.३० टक्के) झाली.
तर ४५ ते ६० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मागील वर्षी ३ लाख ४४ हजार २६७ विद्यार्थी होते. त्यात यंदा घट होऊन २ लाख २९ हजार ३१४ इतकी झाली आहे. तर ४५ टक्क्यांच्या खाली गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी संख्येतही मोठी घट झाली आहे. मागील वर्षी १ लाख ९५ हजार ६०४ विद्यार्थी (११.९५ टक्के) होते. त्यात यंदा घट होऊन ६१ हजार २९४ इतकी (३.७१ टक्के) झाली आहे.