भीमा खोऱ्यातील १८ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:27 AM2020-12-14T04:27:52+5:302020-12-14T04:27:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रातून मान्सून परतून सुमारे दीड महिन्या उलटून गेला तरीही भीमा खोऱ्यातील २५ पैकी १८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रातून मान्सून परतून सुमारे दीड महिन्या उलटून गेला तरीही भीमा खोऱ्यातील २५ पैकी १८ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातही नाझरे व उजनी धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असून खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठा अधिक आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. काही भागात ओला दुष्काळ जाहिर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. मराठवाडा व विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांची हाती आलेली पिके वाहुन गेली. यंदा भीमा व कृष्णा खो-यातील बहुतांश सर्व धरणे शंभर टक्के भरली. राज्यातून मान्सून २८ ऑक्टोबर रोजी परतला. त्यामुळे दीड महिन्यानंतरही बहुतांश धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
भीमा खोऱ्यातील येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा, पवना कासरसाई, वसगाव, पानशेत, गुंजवणी, भाटघर, चिंल्हेवाडी या धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तर पिंपळगाव जोगे धरणात ४७.४५ टक्के, माणिकडोह धरणात ४६.२८ ,वीर धरणात ८४.टक्के, वडिवळे ७५.१९, पवना ८९.२९ आणि खडकवासला धरणात ७५.९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
---
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा
खडकवासला १.६२ टीएमसी (८२.१३ टक्के)
पानशेत १०.४६ टीएमसी (९८.२३टक्के)
वरसगाव १२.२५ टीएमसी (९५.५१ टक्के )
टेमघर २.७० टीएमसी (७२.७९ टक्के)