मंगळवारी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:19 AM2021-05-05T04:19:43+5:302021-05-05T04:19:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मंगळवारी दिवसभरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असून, आज दिवसभरात ३ हजार ६७८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात मंगळवारी दिवसभरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असून, आज दिवसभरात ३ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ दरम्यान, शहरात ५५ हजारांंच्या पुढे गेलेली सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आज ४० हजारांच्या आत आली असून, सध्या शहरात ३९ हजार ८३९ सक्रिय रुग्ण आहेत़ यापैकी सुमारे ३० हजार रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत़
मंगळवारी करण्यात आलेल्या १५ हजार ९८ जणांच्या तपासणी २ हजार ८७९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १९़०६ टक्के आहे़
आज दिवसभरात शहरात ८२ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १९ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ६२ टक्के आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार: शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६७८ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४१३ रुग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत २१ लाख ९० हजार ४४८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ३३ हजार ८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर, यापैकी ३ लाख ८६ हजार १९६ कोरोनामुक्त झाले आहेत़ तर, शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही आज सात हजाराच्या पुढे गेला असून, आतापर्यंत शहरात ७ हजार ५४ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------