अभिनयापेक्षा दिग्दर्शन जास्त तणावाचे- मृणाल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 03:52 AM2019-03-11T03:52:19+5:302019-03-11T03:52:29+5:30

दिग्दर्शन करीत असताना आपल्याबरोबर तांत्रिकदृष्ट्या काम करणाऱ्या शंभर जणांबरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते, त्यामुळे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात जास्त तणाव असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

More than directed by acting; Tension of Mrinal Kulkarni | अभिनयापेक्षा दिग्दर्शन जास्त तणावाचे- मृणाल कुलकर्णी

अभिनयापेक्षा दिग्दर्शन जास्त तणावाचे- मृणाल कुलकर्णी

googlenewsNext

पुणे : अभिनय करत असताना आपण केवळ स्वत:च्या कामावर लक्ष देत, ते चांगल्या पद्धतीने कसे होईल याचा विचार करीत असतो, मात्र दिग्दर्शन करीत असताना आपल्याबरोबर तांत्रिकदृष्ट्या काम करणाऱ्या शंभर जणांबरोबर आपल्याला जुळवून घ्यावे लागते, त्यामुळे अभिनयापेक्षा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात जास्त तणाव असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात गेले तीन दिवस सुरु असलेल्या महिला चित्रपट महोत्सवाचा समारोप आज मृणाल कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या.

आयाम महिला गटाच्या सदस्या मनस्विनी प्रभुणे, नम्रता फडणीस, प्राची बारी, मेघा शिंपी, स्वाती जरांडे, अपर्णा देगांवकर, आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार, वेलकम होम चित्रपटातील छोटी अभिनेत्री प्रांजली श्रीकांत आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘वेलकम होम’ हा चित्रपटदेखील दाखविण्यात आला. यामध्ये मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन, स्पृहा जोशी आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, आशय फिल्म क्लब आणि फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटी आॅफ इंडिया यांच्या वतीने या महिला चित्रपट महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. ‘तिच्या नजरेतून सिनेमा’ ही यावर्षीच्या महिला चित्रपट महोत्सवाची संकल्पना असून यात इजिप्त, बांगलादेश, फ्रान्स, श्रीलंका, तजाकिस्तान या देशांतील चित्रपटांचा रसिकांनी आस्वाद घेतला.
मनस्विनी प्रभुणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

‘वेलकम होम’मध्ये नात्यांचे अनेक पदर
तुम्ही स्वत:ला प्रेरणा कशी देता या प्रश्नाचे उत्तर देताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, आपल्या आवडत्या कामामध्ये स्वत:ला बुडवून घेत त्यातून नवनवीन शिकण्याचा, सकारात्मक राहण्याचा मी नेहमीच प्रयत्न करीत असते. 'वेलकम होम' या चित्रपटात स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असलेल्या नवरा-बायको या नात्यांमधील क्लिष्टता, अनेकविध पदर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असून, त्यातून प्रत्येकाने आपापले उत्तर शोधणे अपेक्षित असल्याचे मत या वेळी डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

दिग्दर्शन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी सुमित्रा मावशींचे सिनेमे हे जणू मेजवानीच असतात. त्यांच्या कथेतील साधेपणा, संवाद आणि प्रामाणिकपणे प्रश्न मांडण्याची पद्धत आम्हा सर्वांनाच भावते. त्यांच्यासोबत काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो. आपल्या मधील अनेक वेगळ्या गुणांची ओळख कलाकाराला त्यांच्या चित्रपटात काम करीत असताना होते, असे मला नेहमी जाणवते. - मृणाल कुलकर्णी

Web Title: More than directed by acting; Tension of Mrinal Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.