दिवाळीसाठी जादा गाड्या, आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:56 AM2017-10-06T06:56:55+5:302017-10-06T06:57:22+5:30
पिंपरी-चिंचवड वल्लभनगर एसटी आगारामधून दिवाळी सणाकरिता शहरातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत खेडेगावात जाण्यासाठी ६० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून, सध्या आगारामध्ये आगाऊ आरक्षण नोंदणी करिता नागरिक मोठी गर्दी
नेहरुनगर : पिंपरी-चिंचवड वल्लभनगर एसटी आगारामधून दिवाळी सणाकरिता शहरातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत खेडेगावात जाण्यासाठी ६० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून, सध्या आगारामध्ये आगाऊ आरक्षण नोंदणी करिता नागरिक मोठी गर्दी करीत आहेत़ आरक्षणाला मोठा प्रतिसाद मिळत असून सध्या ५० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगार हे आगार शहरातील मुख्य आगार असून, या आगारातून महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे, तालुके, शहरे, खेड्यापाड्यात एसटी जाते. दिवाळी सण अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे अनेक नागरिक एसटी बसेसचे आरक्षण करीत असून, आरक्षण करण्यासाठी आगारामध्ये मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत. सध्या ५० टक्के आरक्षण फुल्ल झाले असून, दिवाळी पर्यंत १०० आरक्षण फुल्ल होण्याची शक्यता आहे.
सध्या मराठवाडा विदर्भ या भागात जाण्यासाठी सर्वांत जास्त एसटी बसेसचे आरक्षण होत असल्याचे आरक्षण नोंदणी अधिकारी अश्विनी शिंदे यांनी सांगितले.
वल्लभनगर आगाराने प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा पुरविल्या आहेत. तसेच चार आणि सात दिवसांचा आवडेल तेथे प्रवास हा पास घेण्यासाठीही गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले.