Khadakwasla Dam: खडकवासला धरण साखळीत यंदा गतवर्षीपेक्षा अधिक पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:51 AM2023-07-31T09:51:12+5:302023-07-31T09:52:22+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०.९६ टीएमसीने म्हणजेच ३.३१ टक्के पाणीसाठा जास्त आहे...
पुणे :खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत २२.४५ टीएमसी म्हणजे ७७.०३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०.९६ टीएमसीने म्हणजेच ३.३१ टक्के पाणीसाठा जास्त आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. जुलै महिन्यात गेल्या १५ दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारी (दि. ३०) सायंकाळी ५ वाजेपर्यंत या चारही धरणांत २२.४५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सोडण्यात आला होता. गेल्यावर्षी याचदिवशी चारही धरणांत मिळून एकूण २१.४९ टीएमसी म्हणजेच ७३.७२ टक्के पाणीसाठा होता. यंदा ०.९६ टीएमसीने म्हणजे ३.३१ टक्के पाणीसाठा जास्त आहे.
.............................
धरण टीएमसी टक्के
खडकवासला - १.९४ ९८.४०
पानशेत - ८.७९ ८२. ५६
वरसगाव - ९.६० ७४.८६
टेमघर -२.१२ ५७. २७
एकूण - २२.४५ ७७.०३
................
दिवसभरात झालेला पाऊस :
टेमघर - १० मि.मी.
वरसगाव - ८ मि.मी.
पानशेत - १० मि.मी.
खडकवासला- २ मि.मी.
-------