Pune Dam: पुण्याच्या धरणातील पाणीसाठ्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडले नदीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 07:20 PM2024-09-08T19:20:25+5:302024-09-08T19:21:00+5:30
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे भरल्याने मुठा नदीपात्रात पाजणी सोडले जात आहे
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरण भरली आहेत. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत आतापर्यंत २९.९८ टीएमसी पाणी सोडले आहे. खडकवासला धरण साखळीत आता २८. ८४ टीएमसी म्हणजे ९८.९२ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पेक्षा जास्त पाणी नदीत सोडण्यात आले आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पाऊस जोरदार बसरला. त्यामुळे खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे भरली आहेत. धरणे भरली असल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहेत. आतापर्यंत मुठा नदीत २९.९८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला धरण साखळीत आता २८. ८४ टीएमसी म्हणजे ९८.९२ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यापेक्षा जास्त पाणी नदीत सोडण्यात आले आहे.
धरण टीएमसी टक्के
खडकवासला १.७२ ८७.००
पानशेत १०. ६५ १००
वरसगाव १२. ७६ ९९.५४
टेमघर ३.७१ १००
एकूण २८.८४ ९८.९२