मोरगावचा माघी यात्रोत्सव सुुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:17 AM2019-02-07T00:17:57+5:302019-02-07T00:19:07+5:30

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील माघी यात्रोत्सव मंगळवारपासून (दि. ५) सुरू झाला आहे. तिथीचा क्षय नसल्याने भक्तांना सलग पाच दिवस मयूरेश्वराला स्वहस्ते जलस्नान घालण्याची पर्वणी साधता येणार आहे.

Morgaon fair is start | मोरगावचा माघी यात्रोत्सव सुुरू

मोरगावचा माघी यात्रोत्सव सुुरू

Next

मोरगाव - अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील माघी यात्रोत्सव मंगळवारपासून (दि. ५) सुरू झाला आहे. तिथीचा क्षय नसल्याने भक्तांना सलग पाच दिवस मयूरेश्वराला स्वहस्ते जलस्नान घालण्याची पर्वणी साधता येणार आहे.

यात्रा कालावधीत चिंचवड देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत मोरगावच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्ताने ‘श्रीं’चा मुख्य गाभारा पहाटे ५ ते दुपारी १२ पर्यंत मुक्तद्वार दर्शनासाठी खुला ठेवण्यात येणार आहे. उत्सवाची जय्यत तयारी केली असल्याची माहिती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.

मोरगाव येथील माघी यात्रोत्सव मंगळवार (दि. ५ फेब्रुवारी), माघ शुद्ध प्रतिपदा ते शनिवार (दि. ९ फेब्रुवारी), माघ शुद्ध पंचमी या कालावधीत होणार आहे. उत्सव कालावधीत पहाटे ५ ते दुपारी १२ पर्यंत मयूरेश्वराचा मुख्य मूर्ती गाभारा सर्वधर्मीयांसाठी जलस्नान व अभिषेक पूजेसाठी खुला करण्यात येणार आहे.
गणेशकुंडामध्ये अंघोळ करून मयूरेश्वराला द्वार ठिकाणी जाऊन दूर्वा, फुले वाहण्याची विशिष्ट अशी प्रथा आहे.
आज पूर्व दिशेला असणारा धर्मद्वाराचा टप्पा झाला. दिवसभरात शेकडो भाविकांनी मुक्तद्वार दर्शनाचा लाभ घेतला. मयूरेश्वराला दि. ५ ते ७ पर्यंत दुपारी २ वाजता भरजरी पोशाख व आदिलशाही काळातील सुवर्णालंकार चढविण्यात
येणार आहेत. महासाधू मोरया गोसावीप्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा गुरुवारी (दि. ७) चिंचवड येथून मयूरेश्वर भेटीसाठी
सायंकाळी ७ वाजता मोरगाव येथे येणार आहे.
यात्रेनिमित्त वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे सांगितले.

यंदाही कºहा नदी कोरडी ठणठणीत आहे. मात्र, भाविकांची कोणतीही गैरसोई होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गणेशकुंडामध्ये स्नानासाठी टँकरद्वारे पाणी सोडले आहे.
- मोरेश्वर गाडे,
ग्रामविकास अधिकारी

Web Title: Morgaon fair is start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे