राज्यातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:17 AM2021-02-18T04:17:14+5:302021-02-18T04:17:14+5:30

प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोनारुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. १० फेब्रुवारीपासून ‘पॉझिटिव्हिटी रेट’ही ...

The most active corona patient in the state is in Pune | राज्यातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण पुण्यात

राज्यातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण पुण्यात

Next

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात कोरोनारुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. १० फेब्रुवारीपासून ‘पॉझिटिव्हिटी रेट’ही वाढत चालला आहे. राज्यातील ३५ पैकी १५ जिल्ह्यांमध्ये जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सक्रिय रुग्ण वाढले आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार १५ सक्रिय रुग्ण आहेत. पाठोपाठ ठाणे जिल्ह्यात ५ हजार तर मुंबईत ४ हजार २३८ रुग्ण आहेत. गडचिरोली (५९), तर गोंदिया (८१) येथे सर्वात कमी रुग्ण आहेत.

राज्यात १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान ४३ हजार ८८९ कोरोनाग्रस्त नोंदले गेले. यातले २१ हजार ४८५ रुग्ण केवळ १० ते १५ फेब्रुवारी या सहाच दिवसांत आढळून आले आहेत. राज्यात सलग सातव्या दिवशी कोरोनाचे तीन हजारांहून अधिक रुग्ण सापडले. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ७५ टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ या दोनच राज्यांमध्ये आहेत. त्यामुळे कोरोनाची संभाव्य दुसरी लाट लक्षात घेत आरोग्य यंत्रणेकडून तयारी केली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग ऑक्टोबर-फेब्रुवारी या पाच महिन्यांमध्ये काहीसा कमी झाला होता. त्यामुळे कोरोनाची मास्कचा वापर, शारीरिक अंतराचे महत्त्वच कमी झाल्याचे दिसत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी होणारी गर्दी धडकी भरवणारी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्याच्या तुलनेत सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र ही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात तर नाही ना, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची लस आली असली तरी लसीकरणाची आकडेवारी समाधानकारक नाही. राज्यात आतापर्यंत ५४ टक्के आरोग्य कर्मचारी आणि २६ टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

चौकट

कोरोनाचे मुख्य केंद्र पुन्हा पुणेच

जुलै ते सप्टेंबर २०२० या दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढला असताना पुणे देशातील ‘हॉट स्पॉट’ ठरला होता. पुणे जिल्ह्यात दररोजच्या कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजारांपर्यंत गेली होती. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये खाट न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू ओढवला होता. आता विषाणूच्या स्वरुपात बदल होत असताना वाढती रुग्णसंख्या ही पुण्यासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा ठरू पाहत आहे.

चौकट

जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण सक्रिय रुग्ण मृत्यू

पुणे ३,९५,७०७ -३,८०,६३२ -७०१५ -८०९४

मुंबई ३,१५,०३० -२,९८,५१० -४२३८ -११४२५

ठाणे २,७३,३१७ -२,६२,५२७ -५००० -५७५९

नागपूर १,४१,३७५ -१,३३,३१० -४५९० -३४३७

नाशिक १,२४,०९४ -१,२१,०३३ -१०३७ -२०२३

------------------------------

नवीन रुग्णसंख्या (९ ते १५ फेब्रुवारी)

जिल्हारुग्ण

पुणे ३७३९

मुंबई ३७०९

नागपूर ३०११

अमरावती २८४३

ठाणे २३०३

Web Title: The most active corona patient in the state is in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.