बहुतांश उमेदवारांची संपत्ती कोटींच्या घरात

By admin | Published: February 17, 2017 04:26 AM2017-02-17T04:26:12+5:302017-02-17T04:26:12+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या ३५ उमेदवारांपैकी भोर तालुक्यात १४ उमेदवार कोट्यधीश

Most of the candidates have assets worth crores | बहुतांश उमेदवारांची संपत्ती कोटींच्या घरात

बहुतांश उमेदवारांची संपत्ती कोटींच्या घरात

Next

भोर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या ३५ उमेदवारांपैकी भोर तालुक्यात १४ उमेदवार कोट्यधीश असून, यात गटातील काँॅग्रेसचे आनंद आंबवले आणि गणातील अनिल सावले हे सर्वांत श्रीमंत, तर शिवसेनेचे शिवाजी बांदल सर्वांत गरीब उमेदवार आहेत. कोट्यधीशांच्या यादीत काँॅग्रेसचे ६, राष्ट्रवादीचे ५ तर भाजपाचे २ आणि अपक्ष एका उमेदवाराचा समावेश आहे.
१७ उमेदवारांची मालमत्ता लाखांत, तर दोन जणांची मालमत्ता हजारांत आहे. उत्रौली कारी गटातील काँग्रेसचे उमेदवार आनंद आंबवले यांची मालमत्ता १३ कोटी ५६ लाख ४४ हजार ३५६ रुपये आहे. ते सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. त्यानंतर उत्रौली गणातील अनिल सावले यांची मालमत्ता ९ कोटी ७१ लाख २७ हजार ७६० रु आहे. वेळू-भोंगवली गटातील काँग्रेसच्या सुनंदा सुके यांच्याकडे ७ कोटी २९ लाख ८ हजार रुपये मालमत्ता आहे. तर राष्ट्रवादीचे नसरापूर गणातील उमेदवार लहू शेलार यांची मालमत्ता ६ कोटी ४३ लाख ३७ हजार ७४० रुपये आहे. वेळू-भोंगवली गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनीता बाठे यांची मालमत्ता ६ कोटी २१ लाख ५२ हजार ७९६ रुपये आहे. उत्रौली गणातील राष्ट्रवादीचे श्रीधर किंदे्र यांच्याकडे ५ कोटी ५१ लाख, तर भाजपाचे वेळू गणातील विजया कोंडे यांच्याकडे ५ कोटी २५ लाखांची मालमत्ता आहे. तर कारी उत्रौली गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार रणजित शिवतरे यांच्याकडे ४ कोटी ७ लाख. कारी गणातील दमयंती जाधव यांच्याकडे २ कोटी २८ लाख. नसरापूर गणातील संतोष सोंडकर यांच्याकडे २ कोटी २५ लाख. वेळू-भोंगवली गटातील अपक्ष उमेदवार अश्विनी परदेशी यांच्याकडे १ कोटी ९३ लाख. काँग्रेसचे विठ्ठल आवाळे यांच्याकडे १ कोटी २६ लाख. भाजपाचे भोंगवली गणातील उमेदवार गणेश निगडे यांच्याकडे १ कोटी ११ लाख. भोलावडे गणातील राष्ट्रवादीच्या मंगल बोडके यांच्याकडे ८७ हजार. कमी मालमत्ता शिवसेनेच्या शिवाजी बांदल यांच्याकडे फक्त हजाराची आहे. (वार्ताहर)
दावडी : खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रिंगणातील तब्बल ३५ उमेदवार करोडपती आहेत. बंगले, सदनिका, आलिशान मोटारी, मौल्यवान दागिने, वडिलोपार्जित मालमत्ता त्यांनी सादर केलेल्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येत आहे. नाने-करवाडी गणातील भाजपाच्या उमेदवार सुरेखा मेदनकर सर्वाधिक श्रीमंत ठरल्या आहेत तर रेटवडी गणातील काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी वायाळ यांची मालमत्ता फक्त दोन हजार रुपयांची आहे. जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या १४ जागासाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अर्ज दाखल करताना उमेदवारांना संपत्तीचे विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. निवडणुकमध्ये उत्तरलेल्या सर्व उमेदवारांच्या संपत्तीचे विवरणपत्र निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे.
पिंपरी बुद्रुक-पाईट गटात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असे चारही उमेदवार करोडपती आहेत. शिवसेनेचे उमेदवार कैलास गाळ व यांची ५ कोटी ५७ लाख, भाजपाचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांची २ कोटी ७१ लाख, राष्ट्रवादीचे उमेदवार माणिक कदम यांची ४ कोटी १८ लाख, तर डॉ. राजेंद्र कारले याच्याकडे १ कोटी १८ लाख रुपंयाची मालमत्ता आहे. पाईट गणात चांगदेव शिवेकर यांच्याकडे १ कोटी ४८ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे विवरणपत्राद्वारे घोषित करण्यात आले आहे.
काळुस सांडभोरवाडी गट
नागरिकांचा मागास प्रवगार्साठी राखीव असल्यामुळे या गटात कुणबी वर सर्वच उमेदवारांनी दाखल केली आहे. या गटातील, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा या तिन्ही पक्षांचे उमेदवार कोट्यधीश आहेत. राष्ट्रवादीचे अरुण थिगळे यांची संपत्ती ५ कोटी ७४ लाख १८५ हजार आहे. शिवसेनेचे उमेदवार बाबाजी काळे यांची ४ कोटी ६० लाख ९४ हजार. तर भाजपाचे उमेदवार धनंजय गारगोटे यांची २ कोटी ९८ लाख ३१ हजार इतकी आहे. रेटवडी गणात शिवसेनेच्या सुनीता सांडभोर यांच्याकडे दोन कोटी ९२ लाख ५४ हजार, भाजपाच्या उमेदवार रूपाली चव्हाण यांच्याकडे १ कोटी ६६ लाख रुपयांची संपत्ती आहे. काळूस गणात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुरेखा टोपे यांच्याकडे ११ कोटी, ६६ लाख रुपये, तसेच ज्योती अरगडे यांच्याकडे १ कोटी ५३ लाख रुपयांची संपत्ती आहे.
रेटवडी-पिंपळगाव गट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मला पानसरे यांच्याकडे ३ कोटी ३६ लाख रुपये तर शिवसेनेच्या सुर्वणा जवळेकर / मिसाळ यांच्याकडे ४ कोटी १८ लाख रुपयांची संपत्ती आहे. रेटवडी गणात शिवसेनेचा सुभद्रा शिंदे यांच्याकडे २ कोटी ४८ लाख रुपये, तर पिंपळगाव ते तर्फे खेड गणात शिवसेनेच्या उमेदवार छाया होरे यांच्याकडे २ कोटी ५६ लाख रुपये मालमत्ता आहे.
नायपड-वाशेरे गटात भाजपाचे उमेदवार अतुल देशमुख यांच्याकडे १० कोटी २० लाख, नायफड गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी दत्तू वाळूंज यांच्याकडे २ कोटी २७ लाख रुपयांची तसेच शिवसेनेचे उमेदवार भगवान पोखरकर १० कोटी २२ लाख रुपयांची संपत्ती आहे.
वाशेरे गण
मंदा शिंदे यांची १ कोटी १२ लाख रुपये, तसेच कोयना शिंदे १ कोटी ८६ लाख रुपये संपत्ती आहे. वाडा-कडूस गटीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कांचन ढमाले यांच्याकडे ७ कोटी १९ लाख, भाजपाच्या उमेदवार कल्पना देशमुख यांच्याकडे १० कोटी २० लाखांची मालमत्ता आहे. वाडा गणात भाजपाचे उमेदवार संदीप मुळूक यांच्याकडे ४ कोटी ५१ लाख रुपये,
तसेच शिवसेनेच्या उमेदवार
वंदना ढमाले यांच्याकडे १ कोटी ७० लाख रुपयांची मालमत्ता आहे.
चऱ्होली गण
राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांची २ कोटी ६१ लाख तर शिवसेनेचे अनिल लोखंडे यांच्याकडे ६ कोटींची मालमत्ता आहे. कुरुळी गणातील सर्वच उमेदवार लखपती आहेत. नानेकरवाडी-म्हाळुंगे गटात राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दत्ता गिरे यांच्याकडे १ कोटी ५८ लाख, काँग्रेस पक्षांच्या उमेदवार वैशाली गावडे यांच्याकडे
२ कोटी १ लाख रुपयांची मालमत्ता आहे. नानेकरवाडी गणात शिवसेनेच्या उमेदवार वैशाली जाधव
यांची २ कोटी ४३ लाख, तर भाजपाच्या उमेदवार सुरेखा मेदनकर यांची १८ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता आहे.
म्हाळुंगे गण
रोहिदास तुपे १६ कोटी ८१ लाख रुपये, हनुमंत कड ११ कोटी १० लाख, अमोल पवार ३ कोटी ४३ लाख रुपये तर भाजपाचे उमेदवार संदीप सोमवंशी १३ कोटी ३३ लाख अशी कोटींची संपत्ती प्रतिज्ञापत्राद्वारे सांगण्यात आली आहे.
मुळशीत २४ कोट्यधीश
मुळशी तालुक्यात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार माण- हिंजवडी गटात असून हा गण सर्वसाधारण आहे. पहिल्या क्रमांकावर
भाजपाचे उमेदवार अशोक साठे आहेत. त्यांची मालमत्ता सर्वाधिक २३ कोटी ६१ लाख ३४ हजार ९००रुपये एवढी त्यापाठोपाठ अन्य २३ उमेदवारांची संपत्ती ही कोटीच्या घरात आहे.

Web Title: Most of the candidates have assets worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.