हडपसरमधून सर्वाधिक नगरसेवक
By admin | Published: September 8, 2016 02:02 AM2016-09-08T02:02:18+5:302016-09-08T02:02:18+5:30
महापालिकेच्या निवडणूक विभागाने ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करून त्याचा आराखडा
पुणे : महापालिकेच्या निवडणूक विभागाने ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करून त्याचा आराखडा आज (बुधवारी) विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे सादर केला. शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार हडपसरमधील नगरसेवकांची संख्या वाढली. तेथून सर्वाधिक २८ नगरसेवक पालिकेत येणार आहेत. हडपसर, वडगावशेरी व खडकवासला मतदारसंघातून एकूण दहा नगरसेवकांची संख्या वाढली आहे.
निवडणूक विभागाने केलेल्या प्रभागांच्या प्रारूप आराखड्याची विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून छाननी केली जाणार आहे. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार झाला ना याची तपासणी या समितीकडून केली जाणार आहे. त्याकरिता या समितीला केवळ ५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. १२ सप्टेंबरच्या आत त्यांना हा आराखडा निवडणूक आयोगापुढे सादर करायचा आहे. निवडणूक आयोगाकडून तो २३ सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी जाहीर केला जाईल.
शहराच्या २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार प्रभागांची रचना पाडण्यात येणार आहे. २०११ साली शहराची लोकसंख्या ३१ लाख २४ हजार ४५८ इतकी नोंदविण्यात आली आहे. वाढलेल्या लोकसंख्येनुसार शहरातील नगरसेवकांची संख्या १० ने वाढणार आहे. हे दहा नगरसेवक कोणत्या भागातून वाढणार याची मोठी उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली होती.
वाढलेल्या लोकसंख्येनुसार हडपसर, वडगाव शेरी व खडकवासला मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या वाढली़ तर कसबा मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या कमी झाली़ साधारणत: एक प्रभाग ७० ते ८० हजार लोकसंख्येचा असणार आहे.
त्या भागातील वाढलेल्या महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता १५२ वरून १६२
वर पोहोचली आहे. त्यामध्ये
४ सदस्यांचे ३९ व ३ सदस्यांचे
२ अशा एकूण ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. महापालिकेतील नगरसेवकांच्या सध्या असलेल्या १५२ च्या संख्येत १० ने वाढ झाली असून, १६२ जागांकरिता निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ४ सदस्यांचे ३९ व ३ सदस्यांचे २ अशी एकूण ४१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे.
प्रभागरचनेला उत्तर दिशेकडून सुरुवात करण्यात येऊन त्यानंतर
पूर्वेला वळावे, पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि शेवट दक्षिण दिशेला करण्यात यावा, प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता राखावी,
वस्त्यांचे दोन वेगवेगळ्या प्रभागांत विभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी, आदी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निकषांचे पालन प्रभागरचना तयार करताना करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)