कोरोना रोखण्यासाठी मास्क हे सर्वात प्रभावी साधन : विक्रम खुटवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:53+5:302021-05-22T04:09:53+5:30

कापूरहोळ (ता. भोर) येथे भोर तालुक्यातील गरजू नागरिकांना ३० हजार मास्क वाटपाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड ...

The most effective tool for preventing corona is the mask: Vikram Khutwad | कोरोना रोखण्यासाठी मास्क हे सर्वात प्रभावी साधन : विक्रम खुटवड

कोरोना रोखण्यासाठी मास्क हे सर्वात प्रभावी साधन : विक्रम खुटवड

Next

कापूरहोळ (ता. भोर) येथे भोर तालुक्यातील गरजू नागरिकांना ३० हजार मास्क वाटपाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विक्रमदादा युवा मंचचे अध्यक्ष समीर धुमाळ, म्हसवलीचे सरपंच नथुराम गायकवाड , युवा मंचचे सचिव गणेश मालुसरे, उंबरेचे सरपंच गणेश खुटवड, तांभाडचे उपसरपंच सचिन सोंडकर, उद्योजक धनेश डिंबळे, महेंद्र भोरडे, वरवेचे उपसरपंच अमिर बाठे, तेलवडीचे सरपंच दत्तात्रेय धावले, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष श्रीकांत जामदार, पोलीस पाटील स्वप्निल जामदार , कासुर्डी गु.मा.च्या सरपंच सारिका मालुसरे, सतीश बरदाडे, महेश मालुसरे, राहुल गाडे, मिलिंद काकडे, सुधाकर कोंडे , मोहन इंदलकर, प्रदीप खुटवड ,योगेश शेलार, राम पाचकाळे, लहुजी मालुसरे, गोकुळ आवारे माझगाव, योगेश खुटवड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ३० हजार मास्कचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

मास्क वाटपामुळे नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार असून विविध उपक्रमांमुळे युवा कार्यकर्ते समाजकारणात उतरत आहेत. अनेकजण सरपंच, सदस्य या पदावर काम करत असल्याचे समाधान खुटवड यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाला मास्क मिळावा या उद्देशाने घरोघरी मास्क पोहोचवून ३० हजार मास्क सुरक्षित प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये दिले गेले. मास्कची वाढती मागणी लक्षात घेऊन मास्क तयार करून वाटप करण्यात येईल, असा निर्धार विक्रम खुटवड व समीर धुमाळ यांनी व्यक्त केला.

२१ नसरापूर मास्क

कापूरव्होळ येथे विक्रमदादा युवा मंचतर्फे तीस हजार मास्कचे वाटप विक्रम खुटवड यांच्या हस्ते सुरू केले.

Web Title: The most effective tool for preventing corona is the mask: Vikram Khutwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.