"कोथरूडमधूनच सर्वाधिक 'लीड' मिळेल.." आमदार रवींद्र धंगेकरांचा जबराट 'कॉन्फिडन्स'; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 12:08 PM2024-06-03T12:08:48+5:302024-06-03T12:10:01+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे....
पुणे : लोकसभा निवडणूक निकालासाठी काही तास शिल्लक आहेत. उद्या (मंगळवार, ४ जून) सायंकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे मैदानात आहे. पण खरी लढत मोहोळ आणि धंगेकर यांच्यामध्येच झाली. निकाल काही तासांवर आला असताना धंगेकरांनी विजयाची खात्री असल्याचे सांगितले. मला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लीड मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी धंगेकर म्हणाले, भाजपने लोकांची कामे केली नाहीत. कोथरूडकरांच्या अडचणी सोडविण्यात भाजप अपयशी ठरले आहे. उद्याच्या निकालात मला कोथरूडमधून भरभरून मतदान होईल. त्यामुळे मुरलीधर मोहोळांचे कार्यक्षेत्र असलेल्या कोथरूडमधून मोठे मतदान मविआला मिळेल असा दावा धंगेकरांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि. ४) जाहीर होणार आहे. या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे. पुणे लोकसभा मतदारात महायुतीचे उमेदवार मुरलीधर माेहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. धंगेकरांनी विजयाचा दावा करत कोथरूडमधून लीड मिळेल असं सांगितले.
पुणे लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे, ‘एमआयएम’चे अनिस सुंडके यांच्यात मुख्य लढत झाली. पुणे लाेकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान झाले. या निवडणुकीसाठी ५३.५४ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.