सोसायट्यांमध्येच सर्वाधिक मायक्रो कंटेंमेन्ट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:01+5:302021-04-19T04:11:01+5:30
पुणे : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी पालिका प्रशासन १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मायक्रो कंटेंमेन्ट झोन घोषित करीत ...
पुणे : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी पालिका प्रशासन १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मायक्रो कंटेंमेन्ट झोन घोषित करीत आहे. मागील आठवड्यात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ४९७ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये २२२ इमारती, २२२ सोसायट्या आणि ५३ अन्य ठिकाणांचा समावेश आहे.
नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख़्या वाढणाऱ्या शहरातील सोसायट्या मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून निश्चित केल्या आहेत. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत, तर सर्वात कमी प्रतिबंधित क्षेत्र कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ज्या सोसायट्यांमध्ये २० पेक्षा अधिक व इमारतीत ५ पेक्षा अधिक नवीन बाधित रुग्ण सापडतात, अशा सोसायट्या आणि इमारतींचा यामध्ये समावेश केला आहे.
शहरात ९ फेब्रुवारीपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा लक्षणीयरीत्या वाढत गेला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या सहा हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी आणि वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शहरात ज्या भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत, असे भाग निश्चित करून ते मायक्रो कंटेन्मेंट झोन करून त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात येत आहेत.
---
क्षेत्रीय कार्यालय आणि कंटेंमेन्ट झोन
धनकवडी-सहकारनगर । ७४
वारजे-कर्वेनगर। ६७
औंध-बाणेर। ६२
हडपसर-मुंढवा। ४२
सिंहगड रस्ता। ४१
ढोले पाटील रस्ता। ३१
येरवडा-कळस-धनोरी। ३१
धनकवडी-रामटेकडी। ३०
नगर रस्ता-वडगाव शेरी। २५
बिबवेवाडी। २५
कोथरूड । १९
शिवाजीनगर । १६
भवानी पेठ। १५
कसबा-विश्रामबाग। १०
कोंढवा येवलेवाडी। ०९
एकूण। ४९७