देशातील बहुतांश विमानतळे तोट्यात, २५ विमानतळांचे खासगीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:02 AM2023-02-16T10:02:53+5:302023-02-16T10:03:29+5:30

नवी मुंबईसह २५ विमानतळांचे खासगीकरण

Most of the airports in the country are in loss, 25 airports have been privatized | देशातील बहुतांश विमानतळे तोट्यात, २५ विमानतळांचे खासगीकरण

देशातील बहुतांश विमानतळे तोट्यात, २५ विमानतळांचे खासगीकरण

googlenewsNext

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : कोविडनंतर वाहतूक वाढल्याने २०२३-२५ या कालावधीत नागपूरसह आणखी २५ विमानतळांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार आहे. दहा ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी दुर्गापूर, कन्नूर, सिंधुदुर्ग आणि मोपा संबंधित राज्य सरकारांनी खासगी विकासकांच्या मदतीने विकसित केले आहेत. जेवर, भोगापुरम, नवी मुंबई, कराईकल आणि डबरा येथील नवीन ग्रीनफिल्ड विमानतळांचा विकासदेखील खासगी ऑपरेटर्सना देण्यात येत आहे.
देशातील विमानतळांची संख्या गेल्या नऊ वर्षात दुप्पट करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊ शकतात. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे शेतकऱ्यांसाठी किसान उडान सुरू करण्याचा विचार करत आहेत. परंतु, पुणे, कोलकाता आणि गोवा तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) नियंत्रणाखालील १२४ विमानतळांपैकी बहुतांश विमानतळांना गेल्या पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. 

एएआयचा गेल्या पाच वर्षातील तोटा ५२८५ कोटी रुपयांचा आहे. या काळात पुणे (महाराष्ट्र), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि गोवा यांनी नफा कमावला नसता तर तोटा गगनाला भिडला असता. २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये कोविड महामारीमुळे ही तीन विमानतळेही तोट्यात होती. या विमानतळांनी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२० दरम्यान प्रचंड नफा कमावला.

अकोला, जळगाव, जुहू, कोल्हापूर आणि सोलापूरसह एएआयकडून चालवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व  विमानतळांना सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. तिरूपती, अमृतसर, चंदीगड, हैदराबाद, जोधपूर, शिमला, श्रीनगर आणि यांसारखी काही लोकप्रिय पर्यटन स्थळांचा विमान प्रवास गेल्या पाच वर्षांपासून तोट्यात आहे. २०१८-२०२० मध्ये नफा कमावल्यानंतर २०२०-२१ मध्ये १४ खासगी विमानतळांनादेखील १८४७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

Web Title: Most of the airports in the country are in loss, 25 airports have been privatized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.