शहरातील बहुतांशी रस्ते गल्लीबोळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:11+5:302021-02-17T04:16:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील १ हजार ६५३ कि.मी.च्या रस्त्यांपैकी तब्बल ८८६.४२ कि.मी.चे रस्ते हे ६ मी. रुंदीचे ...

Most of the streets in the city are alleyways | शहरातील बहुतांशी रस्ते गल्लीबोळात

शहरातील बहुतांशी रस्ते गल्लीबोळात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील १ हजार ६५३ कि.मी.च्या रस्त्यांपैकी तब्बल ८८६.४२ कि.मी.चे रस्ते हे ६ मी. रुंदीचे असून, ५११ कि.मी.चे रस्ते हे ९ मी. रुंदीचे आहेत. त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही सुमारे ४५ लाखांच्या आसपास गेली आहे. त्यामुळे वाहनसंख्येच्या तुलनेने शहरातील रस्ते अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी आणि प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे.

शहराची लोकसंख्या गेल्या २०/२५ वर्षांत जवळपास दुप्पट झाली असून, ती आजमितीला ५० लाखांपर्यंत पोहोचली आहे. लोकसंख्या आणि खाजगी वाहनांच्या तुलनेत शहरातील रस्त्यांची संख्या कमी आहे. तर जे रस्ते अस्तित्वात आहेत, त्यापैकी जवळपास ७० टक्के हे अरुंद आहेत. ९ मी.हून अधिक रुंदीचे बहुतांश रस्ते हे उपनगर भागात आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात जुन्या वाड्यांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा वेग फारच कमी आहे. तर उपनगर भाग महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी अनधिकृत आणि गुंठेवारीतील बांधकामांमुळे दाटीवाटीचा झाला आहे.

परिणामी जागेअभावी मलनिस्सारण, पाईपलाईन्स व अन्य सेवा वाहिन्या याच रस्त्यांच्या खालून गेल्याने सर्वच रस्त्यांवर असमतल चेेंबर्समुळे वाहतुकीचा वेग मंदावत चालला आहे. तर पार्किंगची सुविधा नसल्याने सर्व वाहने याच रस्त्यांवर असल्याने अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यांना गल्लीबोळांचे स्वरुप प्राप्त झालेले आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता वाढत्या शहराचा सुनियोजित आराखडा करून त्याची अंमलबजावणी करणे व अतिक्रमणे रोखणे यावर भर देणे गरजेचे झाले आहे.

----///----

Web Title: Most of the streets in the city are alleyways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.