४५ वर्षांवरील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:18+5:302021-07-27T04:10:18+5:30
पुणे : सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रथम ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १ एप्रिलपासून ४५ ...
पुणे : सामान्य नागरिकांच्या लसीकरणाला १ मार्चपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रथम ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १ एप्रिलपासून ४५ ते ५९ या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले. सध्याच्या आकडेवारीनुसार, ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण झाले आहे. या वयोगटात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २० लाखांहून अधिक असून, दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १० लाखांहून जास्त आहे. ४५ वर्षांच्या पुढील ६३ टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर ३३ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे.
कोरोनाची साथ रोखण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिक आणि ४५ ते ५९ या वयोगटातील सर्वसामान्य नागरिक यांच्या लसीकरणाला सुरुवातीपासून प्राधान्य देण्यात आले. १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण सुरू झाल्यानंतरही ४५ ते ५९ आणि ज्येष्ठ नागरिक यांना अनेक केंद्रांवर प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही गटातील नागरिकांचे जास्त लसीकरण झाले आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी सरकारी केंद्रांवर लस घेतली आहे. ४५ ते ५९ या वयोगटाच्या लसीकरणाचे शासकीय आणि खासगी केंद्रांवरील लसीकरणाचे प्रमाण साधारणपणे सारखेच आहे.
४५ वर्षे आणि त्यावरील नागरिकांची जिल्ह्यातील संख्या अंदाजे ३३ लाख इतकी आहे. यामध्ये ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १८ लाख नागरिक तर, ज्येष्ठ नागरिकांची संख्या १५ लाख इतकी आहे. १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. या वयोगटातील ४० टक्के लोकांचा पहिला डोस, तर १ टक्के लोकांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. या वयोगटाकडून खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात या वयोगटातील ४७ लाख लाभार्थी आहेत. त्यापैकी १९ लाख नागरिकांना पहिला डोस, तर ६३ हजार नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे.
-------------------------------
आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप अपूर्ण
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आरोग्य कर्मचाऱ्यांपासून तर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपासून झाली. मात्र, या दोन्ही गटांतील कर्मचाऱ्यांचे अद्याप १०० टक्के लसीकरण झालेले नाही. सुरुवातीला लसीकरणाबाबत असलेले गैरसमज, त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना झालेली कोरोनाची लागण आणि कोविशिल्ड लसींच्या दोन डोसमध्ये असलेले ८४ दिवसांचे अंतर यामुळे १०० टक्के लसीकरण पूर्ण न झाल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
-------------------------------
लाभार्थी पहिला डोसदुसरा डोस
१८-४४ ४७,४२,७३४ १८,८७,८९८६६,१३९
४५-५९ १७,७२,२४३ ११,२६,९४०५,४२,३४४
६० वर्षांवरील१४,६२,३२६ ९,२१,८९९५,३२,९४३
--------------------------------
टक्केवारी
पहिला डोस दुसरा डोस
१८-४४ ४० १
४५-५९ ६३ ३०
६० वर्षांवरील ६३ ३६
---------------------------------