'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ', नराधमाकडून मायलेकींचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 05:57 PM2022-05-06T17:57:09+5:302022-05-06T17:57:34+5:30
मायलेकींचा पाठलाग करणा-या परप्रांतीय तरूणांस तिच्या पती व स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
लोणी काळभोर : सकाळी अल्पवयीन मुलीसह फिरावयास गेलेल्या महिलेस कोयत्याचा धाक दाखवून 'रुको रूको वो लडकी को मुझे दे दो उसके साथ मजा करना है', असे म्हणत पाठलाग करणा-या परप्रांतीय तरूणांस तिच्या पती व स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून दिलीप राजू थापा (वय २६ वर्षे, सध्या राहणार रामदरा रोड, अंबरनाथ मंदीराजवळ चढावर, ता. हवेली, मुळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला नेहमी सकाळी फिरण्यासाठी रामदरा रोडला आपल्या १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला घेऊन जात असते. नेहमीप्रमाणे शुक्रवार (६ एप्रिल) रोजी सकाळी ५-४५ वाजण्याच्या सुमारांस त्या दोघी घरातून रामदरा रोडने रामदरा मंदिराकडे वॉकिंसाठी जावून परतत होत्या. सकाळी ६-४५ वाजण्याच्या सुमारांस रामदरा रोडवरील कोळपेवस्ती नजीकच्या रेल्वे पुलावर आल्या. त्यावेळी त्यांच्या मागून थापा आला व दोघींना पाहून हिंदीमध्ये 'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ' असे म्हणाला. हे ऐकून दोघी घाबरून भितीपोटी पळू लागल्या. त्याने त्याच्या कमरेला असलेला कोयता हातात घेवून 'रुको रूको वो लड़की को मुझे दे दो उसके साथ मजा करना है असे म्हणून पाठलाग करून लागला. काही अंतर गेल्यानंतर समोरून एक पिकअप येत होता. त्यासमोर जाऊन तो उभा राहिला. ही संधी साधून दोघी मायलेकींनी बाजूला असलेल्या घरात जावून आसरा घेतला.
तेथून फिर्यादी महिलेने रामदरा मंदीराजवळ क्रिकेट खेळत असलेल्या पतीशी फोनवरून संपर्क साधून घडला प्रकार सांगितला. याचवेळी महिला घरातून तो माणूस कोठे जात आहे यावर लक्ष ठेवून होती. तो रामदरा मंदीराकडे जात असताना त्याचा मित्र त्यास गाडीवर बसवून तु असे का करतो, मार खाशील असे म्हणून मोठ्यने आवाज करुन त्यास जबरदस्तीने गाडीवर बसवून घेवून गेला. थोड्या वेळावे पती रेल्वे ब्रिज जवळ गाडीवर येत असताना दिसले. ते आल्यानंतर विचारपूस करून पत्नीस गाडीवरून रामदरा मंदीरापर्यंत गेले परंतु तो दिसला नाही. ऊस तोड सुरू असलेल्या ठिकाणी जावून चौकशी केली असता एकाने तो माणूस रामदरा रेल्वे पुलाचे खाली काम करतो व तेथेच राहण्यास आहे अशी माहिती दिली. दोघे परत रेल्वे पुलावर आले असता जो माणूस त्याला घेऊन गेला तो भेटला. त्याचेकडे केलेल्या चौकशीत थापा कोळपे वस्तीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. ते त्यास पाहत येत असताना तो रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. त्यावेळी पतीने क्रिकेट खेळत असलेला भाऊ व मित्रांना बोलावले. १०० नंबरवर फोन केला संपर्क साधल्यानंतर थोड्याच वेळात लोणी काळभोर पोलीस तेथे आले व दिलीप थापा याला कोयत्यासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेवून गेले. महिलेने तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.