Pune Crime: दारू पिणाऱ्या दोन मित्रांची भांडणं; मध्यस्थी करणाऱ्या आईवरही कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:24 AM2022-02-14T11:24:50+5:302022-02-14T11:25:10+5:30
पुणे : दारू पित असताना झालेल्या वादातून टोळक्याने तरुणासह त्याच्या आईवर कोयत्याने वार करून गंभीररीत्या जखमी केले. त्यानंतर आरडाओरड ...
पुणे : दारू पित असताना झालेल्या वादातून टोळक्याने तरुणासह त्याच्या आईवर कोयत्याने वार करून गंभीररीत्या जखमी केले. त्यानंतर आरडाओरड करून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी आकाश कांबळे, अनिकेत कांबळे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ जगदाळे (वय २४) आणि सरस्वती जगदाळे (दोघे रा. आंबेगाव बुद्रुक) अशी जखमी झालेल्यांची नावे आहे. ही घटना आंबेगाव बुद्रुकमधील समर्थ इमारतीजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली.
सोमनाथ आणि आकाश एकमेकांच्या ओळखीचे असून, ११ फेब्रुवारी रोजी रात्री ते मित्रांसोबत दारू पित बसले होते. त्यावेळी झालेल्या वादातून त्यांनी सोमनाथला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सरस्वती यांनी भांडणात मध्यस्थी केली. मात्र, आकाशने सोमनाथ आणि सरस्वती यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीररीत्या जखमी केले. जखमींना कोणी मदत केली तर सोडणार नाही, अशी धमकी दिल्यामुळे स्थानिकांसह दुकानदारांनी दुकाने बंद केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करीत आहेत.