आईने मोबाइल काढून घेतल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Published: April 10, 2017 02:17 AM2017-04-10T02:17:48+5:302017-04-10T02:17:48+5:30

मोबाइलचा अतिवापर करू नये, यासाठी आईने मोबाइल काढून घेतल्याचा राग आल्याने

Mother committed suicide by taking her mobile | आईने मोबाइल काढून घेतल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

आईने मोबाइल काढून घेतल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Next

भिगवण : मोबाइलचा अतिवापर करू नये, यासाठी आईने मोबाइल काढून घेतल्याचा राग आल्याने १२ वीच्या विद्यार्थ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना शनिवारी संध्याकाळी भिगवण येथील लक्ष्मी सोसायटीत घडली.
बराच वेळ गेला तरी यश घरी आला नाही. यासाठी त्याचा शोध घेतला असता बंद असणाऱ्या घराच्या दरवाजाला कुलूप नसल्याचे लक्षात आल्याने दार उघडल्यावर हा प्रकार लक्षात आला. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात रमेश आबूराव सोनोने यांनी खबर दिली आहे. भिगवण पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. अगदी शुल्लक कारणावरून एकुलता एक मुलगा असणाऱ्या यशने आत्महत्या केल्याने भिगवणकर हळहळ व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Mother committed suicide by taking her mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.