खळबळजनक! पुण्यात इंजिनिअर मुलाकडून आईची हत्या; नंतर गळफास घेत केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 10:30 AM2022-01-02T10:30:44+5:302022-01-02T10:30:59+5:30

मेसेज करुन आधी नातेवाईकांना दिली माहिती.

Mother killed by engineer's son in Pune; He later committed suicide by hanging himself | खळबळजनक! पुण्यात इंजिनिअर मुलाकडून आईची हत्या; नंतर गळफास घेत केली आत्महत्या

खळबळजनक! पुण्यात इंजिनिअर मुलाकडून आईची हत्या; नंतर गळफास घेत केली आत्महत्या

Next

पुणे : आपल्या ७६ वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांचा हत्या केली. त्यानंतर इंजिनिअर असलेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने पहाटे मेसेज करुन माहिती दिल्यानंतर आत्महत्या केली. गणेश मनोहर फरताडे आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे अशी या दोघांची नावे आहेत. 

याप्रकरणी गणेश याची मावस बहिण शोनित सावंत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे व आपली आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये रहात होते. ग़णेश हा इंजिनिअर होता. त्याची नोकरी गेली होती. ५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यांच्या आजारपणात खूप पैसा खर्च झाला होता. त्याची आईलाही अनेक व्याधी होत्या. त्यावर खूप पैसे खर्च होत होते. आईच्या औषधावर होणारा खर्च व नोकरी नसल्याने त्याला खूप कर्जही झाले होते. या कारणामुळे तो निराश झाला होता. त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

आपल्यामागे आईचे कोण पाहणार, हे लक्षात घेऊन त्याने आईला औषधांचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्‍यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्‍या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून त्यांची हत्या केला. त्यानंतर त्याने शनिवारी पहाटे २ वाजून १० मिनिटांनी एक मेसेज केला. आपण बेरोजगारी आणि कर्ज बाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहोत, असा मेसेज त्याने आपल्या नातेवाईकांना पाठविला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

त्याच्या नातेवाईकांनी गणेशचा मेसेज सकाळी पाहिला. त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मावस बहिणीच्या फिर्यादीनंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mother killed by engineer's son in Pune; He later committed suicide by hanging himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.