सासरा, दिराचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अल्पवयीन मुलीवर बलात्कार व अॅट्रॉसिटी प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:30 AM2018-04-06T03:30:31+5:302018-04-06T03:30:31+5:30
फसवणुकीद्वारे लग्न करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात दीर आणि सासऱ्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. तर जाऊ आणि सासूचा अटकपूर्व मंजूर केला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला.
पुणे - फसवणुकीद्वारे लग्न करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात दीर आणि सासऱ्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. तर जाऊ आणि सासूचा अटकपूर्व मंजूर केला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा आदेश दिला.
मुख्य आरोपी व पीडितेच्या पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणात अटक केली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. याबाबत २० वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. ही घटना सन २०१५ ते २०१६ दरम्यान आंबेगाव खुर्द येथे घडली. त्या वेळी फिर्यादी अल्पवयीन होती. पीडितेच्या पतीने पहिले लग्न झाल्याचे लपवून लग्नाच्या अमिषाने फिर्यादीला पळवून नेले व तिच्यावर बलात्कार केला. तिचे वडील ज्या वेळी मुलीच्या सासरी गेले त्या वेळी पती व दिराने त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकावून बदनामी करण्याची धमकी त्यांना दिली. त्यानंतर तिच्या पतीने फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही शाळेच्या दाखल्यावर तिचे वय वाढविले.
दरम्यान, सासरे आणि दीर , सासू पती, जाऊ यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. पीडितेने सर्वांची नावाने फिर्यादीत दिली आहेत. गुन्ह्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. या प्रकरणात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल आहे. अॅट्रॉसिटी कलम १८ नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही. सासºयानेही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सासºयाला अटक करून त्याच्याकडे तपास करणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद अॅड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने सासरा आणि दिराचा अटकपूर्व जामीन फेटाळला, तर जाऊ आणि सासूला अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सासू आणि जावेने तिला शारीरिक आणि मानसिक त्रासा दिला. सासºयाने घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादी मागासवर्गीय आहे. त्यामुळे या प्रकरणात अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे.