... म्हणून मद्यपी जावयाने केला वारकरी सासूचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 17:05 IST2019-05-08T16:56:44+5:302019-05-08T17:05:35+5:30
घरात न घेतल्याने आपला अपमान झाल्याचा राग मनात धरून जावयाने सासूचा खून केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. औंधमधील संजय गांधी वसाहतीत बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता हा प्रकार घडला.

... म्हणून मद्यपी जावयाने केला वारकरी सासूचा खून
पुणे : घरात न घेतल्याने आपला अपमान झाल्याचा राग मनात धरून जावयाने सासूचा खून केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. औंधमधील संजय गांधी वसाहतीत बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता हा प्रकार घडला.
सुदामती देवराम गायकवाड (वय ६०, रा़ संजय गांधी वसाहत, औंध) असे सासूचे नाव आहे़. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दिगंबर ओव्हाळ (वय ४५) या जावयाला ताब्यात घेतले आहे़. वारकरी सांप्रदायाची असलेली सासू भजन किर्तनमध्ये रमणारी़ तर जावई मास मच्छी खाणारा, दारु पिऊन येणारा होता. त्यातून त्यांच्यात कायम वाद होत होते़. घटनेच्या वेळीही दिगंबर दारू पिऊन आणि मांसाहारी पदार्थ खाऊन आल्यामुळे त्याला सुदामती यांनी घरात घेण्यास नकार दिला. घरात न घेतल्याने आपला अपमान झाला असे त्याला वाटत होते़. त्यावरुन त्याचा सासूवर राग होता़. या रागाच्या भरातच बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजता त्यांच्यात वाद झाला़ तेव्हा त्याने लोखंडी रॉडने सदामती यांना मारहाण केली़. त्यात त्यांचा मृत्यु झाला़.
दरम्यान दिगंबर हा मजूरीचे काम करतो. त्याचे यापुर्वी एक लग्न झालेले आहे..त्याने सुदामती यांच्या जयश्री नावाच्या मुलीसोबत दुसरे लग्न केल्यानंतर ते औंध येथील संजय गांधी वसाहतीतील लमाण तांडा परिसरातील वाघमारे वस्ती येथे राहत होते.सासू सुदामती आणि दिगंबर व त्याची पत्नी जवळच राहण्यास होते.या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ दिगंबरला ताब्यात घेतले आहे.