आईचा कोरोनामुळे मृत्यू,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:45+5:302021-05-23T04:10:45+5:30

ढाळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर जळोची येथील घटना : ढाळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर मेखळी : काही दिवसांपूर्वी आईचा कोरोनामुळे ...

Mother's coronal death, | आईचा कोरोनामुळे मृत्यू,

आईचा कोरोनामुळे मृत्यू,

Next

ढाळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

जळोची येथील घटना : ढाळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

मेखळी : काही दिवसांपूर्वी आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आलेल्या मुलीचा देखील सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना जळोची येथे घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बारामती तालुक्यातील जळोची गावात राहणाऱ्या ढाळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवार (दि.२१ मे) रोजी जळोची येथे मनीषा ठोंबरे यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच आई सरूबाई बंडा ढाळे (रा. जळोची) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची मुलगी मनीषा ठोंबरे (रा. रेडणी, इंदापूर) या ठिकाणाहून जळोची गावात आल्या होत्या. जळोची येथे राहत्या घरी सकाळी साडेसातच्या दरम्यान झाडलोट करीत असताना त्यांना पायाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी साप पाहिला; पण साप अडचणीत गेल्याने परत दिसला नाही. सर्पदंशनंतर त्यांना तत्काळ बारामती येथे उपचाराकरिता दवाखान्यात हलवण्यात आले. परंतु वाटेतच त्यांची प्रकृती खालावली.

सर्पदंशावर उपचारासाठी लागणारे व्हेंटिलेटर बेड मिळवण्यासाठी ठोंबरे यांना बारामतीमधील बऱ्याच रुग्णालयात फिरवावे लागले. मात्र कोरोनामुळे बेड कमी असल्यामुळे त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. यादरम्यान त्यांचा सकाळी १० च्या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना जळोची येथून त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी हलवण्यात आले. त्यांना तीन वर्षांची मुलगी व सहा वर्षांचा एक मुलगा आहे. दुपारी ३ च्या सुमारास कुटुंबीयांना त्याच जागेवर कपडे धुण्याच्या मशीनजवळ फरशीखाली एक साप दिसला असता, ढाळे कुटुंबीयांनी बारामती येथील ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संस्थेचे सर्पमित्र अमोल जाधव यांना साप पकडण्यासाठी फोन करून पाचारण केले. सर्पमित्र जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत फरशीखाली लपलेला तीन फूट लांबीचा इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा जातीच्या विषारी नागाला शिताफीने पकडले. सर्पमित्र अमोल जाधव यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून विषारी नागाला बारामती वन विभागाच्या ताब्यात दिले. वन कर्मचाऱ्यांनी वन विभागाच्या निर्जनस्थळी निसर्गात या सापाला मुक्त केले.

---------------------------

फोटो : मनीषा ठोंबर

२२०५२०२१-बारामती-०७

-----------------------------

Web Title: Mother's coronal death,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.