धक्कादायक! प्रेमात आईचा अडथळा, मुलाने केला आईचा खून, लोणीकंद येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:24 PM2021-03-10T13:24:33+5:302021-03-10T13:41:26+5:30

आरोपी मुलानेच केली पोलिसांकडे फिर्याद

Mother's killed by son in lonikand | धक्कादायक! प्रेमात आईचा अडथळा, मुलाने केला आईचा खून, लोणीकंद येथील घटना

धक्कादायक! प्रेमात आईचा अडथळा, मुलाने केला आईचा खून, लोणीकंद येथील घटना

Next
ठळक मुद्देप्रेयसीशी संगनमत करून प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईचा खून

लोणीकंद: मुलाने आपल्या प्रेमप्रकरणात आईचा अडथळा निर्माण होत असल्याने प्रेयसीसोबत संगनमत करून आईचा खून केल्याची गंभीर घटना  
वढु खुर्द (ता. हवेली) येथे घडली आहे. सुशिला राम वंजारी (वय ३८, रा. मानेवस्ती वढु खुर्द (ता.हवेली) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. भर वस्तीत घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्याद देणारा मुलगा व प्रियसीला अटक करण्यात आली आहे. 
      विशाल राम वांजारी (वय १९) असे आरोपी मुलाचे नाव तर नॅन्सी गॅबरियल डोंगरे (वय २६) असे त्याच्या प्रियसीचे नाव आहे. या खूनाची फिर्याद देणारा मुलगाच खुनी निघाल्याने परिसरात खळबळ  पसरली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल राम वंजारी यांने प्रेयसी नॅन्सी गॅबरियल डोंगरे हीच्याशी संगनमत करून प्रेमात अडथळा ठरणाऱ्या सुशिला यांनी १५ हजार ५०० चोरले म्हणून भांडण केले.  रागाच्या भरात त्याने  सुशिला यांचा सोमवारी पहाटे धारदार शस्त्राच्या साहाय्याने खून केला. घटनेनंतर स्वत: पोलिस ठाण्यात जात विशालने आईच्या खुनाची फिर्याद दिली. तसेच शिवा देशमुख नावाच्या एक व्यक्ती खून करून फरार झाल्याचे खोटे सांगितले. पोलिसांनी वारंवार त्याच्याकडून जबाब घेतल्याने त्यात पोलिसांना तफावत आढळली. यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच आईचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. यानंतर या घटनेचा उलगडा झाला.  या कबुली जबाबानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 जिल्हा पोलिस आधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, विभागीय पोलीस आधिकारी डॉ सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शन खाली, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलिस निरीक्षक विनायक वेताळ, मनोज तपसारे, नितिन आतकरे, केशव वाबळे, हनुमंत पडळकर, विक्रम जाधव व सहकार्यानी तपास केला तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Mother's killed by son in lonikand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.