जागेची कागदपत्रे द्यावीत म्हणून मुलानेच केला आईचा खून; अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:54 AM2017-12-08T11:54:54+5:302017-12-08T12:27:29+5:30

जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार  गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये ही घटना पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान घडली.

Mother's murder by son; Filed a complaint in the Alankar police station | जागेची कागदपत्रे द्यावीत म्हणून मुलानेच केला आईचा खून; अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जागेची कागदपत्रे द्यावीत म्हणून मुलानेच केला आईचा खून; अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देजागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी आईला जबर मारहाणगेल्या काही दिवसांपासून मुलांकडूनच आपल्या जन्मदात्याना संपविण्याचे प्रकार

पुणे : जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार  गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये ही घटना पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र तपासणीनंतर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अरूणा मनोहर सपकाळ असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा आनंद सपकाळ (वय ४३) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईकडे जागेची कागदपत्रे देण्याचा त्याने सातत्याने तगादा लावला होता. ती देत नसल्याच्या कारणावरून तो आईला मारहाण करायचा, त्यादिवशी देखील त्याने आईला जबर मारहाण केल्यामुळे त्यात आईचा मृत्यू झाला. 

दरम्यान आई उठत नसल्याबद्दल मुलगा आनंद याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याच्या आईस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंगावर कोठेही जखम नव्हती. मात्र पोस्ट मॉर्टम रिपोर्ट (छवविच्छेदन अहवाल) नंतर छातीवर जखमा आढळून आल्या. पोलिसांनी या संबंधी तपास केला असता आई-मुलामध्ये भांडण होत असल्याचे शेजाऱ्यांकडून पोलिसांना समजले. त्यानंतर मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा मान्य केला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुलांकडूनच आपल्या जन्मदात्याना संपविण्याचे प्रकार घडत असल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी शनिवार पेठ येथे मुलाने आई-वडिलांचा खून केला. वाघोली येथे मुलाने वडिलांचा तर एरंडवणा येथे आईचा खून केल्याची घटना घडली. ही तिसरी घटना आहे.

Web Title: Mother's murder by son; Filed a complaint in the Alankar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.