Success Story: 'स्वप्नांशिवाय यश अधुरं...'! १२ तासांची नोकरी करत UPSC ची तयारी, अखेर परमिता जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 02:16 PM2024-06-14T14:16:25+5:302024-06-14T14:29:34+5:30
UPSC परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा टक्का अगदी नगण्य असल्याने प्रत्येक वर्षी केवळ एक हजारभर परीक्षार्थी यशस्वी होतात... (Union Public Service Commission exam, upsc exam, motivational story, success story...)
Paramita Malakar UPSC Success Story : देशातील सर्वात मोठी आणि कठीण असणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस- आयपीएस (IAS, IPS) होण्याचे स्वप्ने लाखो तरुण-तरुणी पाहतात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा टक्का अगदी नगण्य असल्याने प्रत्येक वर्षी केवळ एक हजारभर परीक्षार्थी यशस्वी होतात. नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये पश्चिम बंगालच्या परमिता मालाकरला यश मिळाले. यावर्षी सुमारे एक हजार परीक्षार्थींनी या यश मिळवले आहे. मग परमिताच्या यशात विशेष काय? असा प्रश्न पडला असेल. जे परीक्षार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांची प्रत्येकाची काहीतरी कहाणी आहेच. पण परमिता मालाकरच्या यशात विशेष म्हणजे तिची आवड दिसून येते. स्वतःच्या पॅशनसाठी तिने १२ तासांची नोकरी करत या परीक्षेची तयारी केली. अनेक नोकऱ्या बदलल्या आणि अखेर सहाव्या प्रयत्नात तिला यश मिळाले.
पदवीनंतर लगेच नोकरी -
परमिता मालाकरने २०१२ मध्ये बीएससी (ऑनर्स) भौतिकशास्त्राची पदवी घेतली. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी बीपीओमध्ये नोकरी स्वीकारली. काही महिने बीपीओमध्ये काम केल्यानंतर परमिताने तिच्या कॉर्पोरेट करिअरला सुरुवात केली. ती आधी टीसीएस आणि नंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झाली. यानंतर त्यांना २०२० मध्ये उपविभागीय माहिती आणि सांस्कृतिक अधिकारी (SDISO) ची सरकारी नोकरी मिळाली.
TCS मध्ये नोकरी करत केली यूपीएससीची तयारी -
टीसीएसमध्ये नोकरी करत असताना परमिताने पहिल्यांदा २०१८ मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. त्यावेळी तिला १२ तासांची नोकरी करत परीक्षेची तयारी करावी लागत होती. कामाचा लोड असल्याने अभ्यासासाठी खूप कमी वेळ होता. त्यामुळे परीक्षा देत असताना पहिल्याच प्रयत्नात तिला अपयश आले. त्यानंतर काही काळ ती निराशही झाली. पण तिथे हार न मानता तिने प्रयत्न सुरू ठेवले. नंतर हळूहळू परमिताचा आत्मविश्वास वाढत गेला.
30 व्या वर्षी परीक्षा द्यायला सुरुवात -
पारमिने वयाच्या 30 व्या वर्षी तिने एलआयसी, बँक पीओ, रेल्वे आणि पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगाच्या विविध भरती परीक्षा देण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये तिने SDICO च्या परीक्षेत यश मिळवले. त्याचबरोबर लोकसेवा नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेत तिला यश मिळाले. पण पुढील टप्प्यात तिला अपयश आले. यावेळी तिच्या हातात एक पोस्ट असल्याने तिचा आत्मविश्वास दुनावला होता. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे २०२३ साली परमिताने चांगली तयारी करून परीक्षेचे तिन्ही टप्पे पार केले आणि यश मिळवले.
दृष्टीकोन महत्त्वाचा -
एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा संरचित दृष्टीकोन (Structural approach) असला पाहिजे. तो माझ्याकडे कमी असल्याने मला सुरूवातीला अपयश आले असल्याची कबुलीही परमिताने दिली. नोकरीत वारंवार होणाऱ्या बदलांमुळे एकाग्रतेने अभ्यास करण्याची वेळ खूपच कमी झाली होती. परीक्षेची तयारी करताना जुन्या प्रश्नपत्रिकांचा चांगला अभ्यास केला त्यामुळे परीक्षेचे रुप समजून घेता आले अन् पोस्ट मिळाली, असंही ती म्हणाली. त्यामुळे या परीक्षेची तयारी करताना जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे आणि त्यावर जास्त फोकस केला पाहिजे. तसेच याकाळात मॉक टेस्ट जास्तीत जास्त सोडवा, असा सल्लाही तिने परीक्षार्थींना दिला.