टायर फुटल्याने मोटारीला अपघात; जीवितहानी टळली

By admin | Published: May 4, 2017 12:08 AM2017-05-04T00:08:35+5:302017-05-04T00:08:35+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावर गलांडवाडी न. १ (ता. इंदापूर) येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने

Motor car accidents kill tire; Survival survived | टायर फुटल्याने मोटारीला अपघात; जीवितहानी टळली

टायर फुटल्याने मोटारीला अपघात; जीवितहानी टळली

Next

लोणी देवकर : पुणे-सोलापूर महामार्गावर गलांडवाडी न. १ (ता. इंदापूर) येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी स्वीफ्ट डिझायरचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले.
स्वीफ्ट डिझायर (एमएच ४२/एएच ४३१०) गाडीचा डाव्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने चालक सचिन माने (वय ३०, रा. काझड, ता. इंदापूर) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी महामार्ग व सेवा रस्ता यामध्ये घुसली.
सेवा रस्ता व महामार्गामधील पुलाला जोरदार ठोकर देऊन ५ ते ६ फूट उंच उडून खाली कोसळली. प्रवास करणारे सचिन माने व अवधूत कोकरे यांना सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीचे मोठे नुकसान झाले. (वार्ताहर)

Web Title: Motor car accidents kill tire; Survival survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.